iPhone 16 सिरीजमध्ये सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं? काय आहे खास? वाचा किंमत ते फीचर्स

Last Updated:

iPhone 16 सिरीज लाँच करण्यात आली. याशिवाय एअरपॉड आणि वॉचही लाँच केले. आधीच्या आयफोनच्या तुलनेत ५० टक्के जास्त मजबूत असा हा फोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

News18
News18
दिल्ली : Apple इवेंटमध्ये कंपनीने iPhone 16 सिरीज लाँच करण्यात आली. याशिवाय एअरपॉड आणि वॉचही लाँच केले. आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लसमध्ये ऑक्टा कोर ए१८ चिपसेट देण्यात आलाय. आयफोन 16 सिरीजमधील सर्वात स्वस्त अशा बेस मॉडेलची किंमत ७९९ डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार हा आयफोन ६७ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. (iPhone 16 Series)
Apple इवेंटमध्ये कंपनीने iPhone 16 सिरीज लाँच करण्यात आली. याशिवाय एअरपॉड आणि वॉचही लाँच केले. आयफोन १६ आणि आयफोन १६ प्लसमध्ये ऑक्टा कोर ए१८ चिपसेट देण्यात आलाय. आयफोन 16 सिरीजमधील सर्वात स्वस्त अशा बेस मॉडेलची किंमत ७९९ डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार हा आयफोन ६७ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. (iPhone 16 Series)
आयफोन 16 मध्ये एक नवं फीचर मिळणार आहे. या फीचरमध्ये तुम्ही कॅमेऱ्याने एखादी गोष्ट स्कॅन करून त्याची माहिती मिळवू शकता. जर तुम्ही नव्या रेस्टॉरंटपासून जात असाल तर कॅमेरा रेस्टॉरंटच्या दिशेने करून तुम्ही माहिती मिळवू शकता. रेस्टॉरंट कधी उघडतं, तिथे काय मिळतं याची माहिती मिळू शकेल.
advertisement
सिरीमध्ये नवं अपडेट
एआय टेक्नॉलॉजीमुळे सिरी आणखी स्मार्ट बनलं आहे. सिरीमध्येही नवे अपडेट आले असून एपल पुढच्या काही महिन्यात अनेक देशांमध्ये एआय फीचर सर्वांसाठी उपलब्ध करून देईल. पुढच्या वर्षी यामध्ये वेगवेगळ्या भाषाही मिळतील.
बेस मॉडेलची किंमत किती
आयफोन १६ च्या बेस मॉडेलमध्ये १२८ जीबी स्टोरेज असणार आहे. याशिवाय २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिअंटमध्येही फोन उपलब्ध असेल. आयफोन १६ प्लसच्या बेस मॉडेलची किंमत ८९९ डॉलर म्हणजेच ७५ हजार रुपये इतकी असेल. याचे स्टोरेज १२८ जीबी असणार आहे. आयफोन १६ प्लसमध्ये ५१२ जीबी पर्यंत स्टोरेजचे व्हेरिअंट आहेत.
advertisement
इतर फोनच्या तुलनेत दुप्पट भक्कम
आयफोन 16 नव्या सिरॅमिक शील्ड ग्लाससह मिळतो. आधीच्या आयफोनच्या तुलनेत ५० टक्के जास्त मजबूत असा हा फोन आहे. तसंच इतर फोनच्या तुलनेत दुप्पट मजबूत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
नवं एआय फीचर
Apple चं नवं AI फीचर, आयओएस 18 बीटामध्ये मिळणार आहे. हे फीचर सध्या काही देशांमध्ये ट्रायलसाठी उपलब्ध आहे. या फीचरमुळे iPhone आणि iPad स्मार्ट बनतील. Apple ने म्हटलं की, हे फीचर तुमचं काम समजून घेण्यासाठी आणि तुम्हाला गरजेची माहिती देण्यास मदत करेल.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
iPhone 16 सिरीजमध्ये सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं? काय आहे खास? वाचा किंमत ते फीचर्स
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement