इथं स्वस्तात आहे नवा iPhone 16; तब्बल 1,19,900 रुपयांचा फोन काही हजारांत मिळतोय
- Published by:Priya Lad
- trending desk
Last Updated:
iPhone 16 Price : अॅपलच्या प्रत्येक सीरिजमधील प्रत्येक फोनची किंमत देशानुसार वेगळी असते. अमेरिका, कॅनडा, दुबई (यूएई), हाँगकाँग आणि व्हिएतनाम यांसारख्या देशामध्ये आयफोनच्या किमती भारतापेक्षा वेगळ्या आहेत. काही देशांमध्ये भारताच्या तुलनेत आयफोन स्वस्त मिळतात.
नवी दिल्ली : यावर्षी 9 सप्टेंबर रोजी आयफोन 16 सीरिज लाँच करण्यात आली. कंपनीने 'अॅपल ग्लोटाइम इव्हेंट 2024' या कार्यक्रमात जागतिक स्तरावर आयफोन 16 सीरिज लाँच केली. लाँच झाल्यानंतर लगेचच या फोनला खरेदीसाठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं दिसत आहे. नवीन सीरिजमध्ये कंपनीने चार मॉडेल लाँच केली आहेत. आयफोन 16 हे या सीरिजमधील बेस मॉडेल आहे. भारतात त्याची किंमत सुमारे 80 हजार रुपये आहे. जर तुम्हाला 128 GB स्टोरेज असलेला आयफोन 16 मोबाईल घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 79 हजार 900 रुपये खर्च करावे लागतील.
अॅपलच्या प्रत्येक सीरिजमधील प्रत्येक फोनची किंमत देशानुसार वेगळी असते. अमेरिका, कॅनडा, दुबई (यूएई), हाँगकाँग आणि व्हिएतनाम यांसारख्या देशामध्ये आयफोनच्या किमती भारतापेक्षा वेगळ्या आहेत. काही देशांमध्ये भारताच्या तुलनेत आयफोन स्वस्त मिळतात. त्यामुळे जर तुमचा एखादा नातेवाईक किंवा मित्र यापैकी एखाद्या देशात राहत असेल तर आयफोन 16 खरेदीसाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. त्यांच्या करवी तुम्ही आयफोन 16 सीरिजमधील फोन खरेदी करून काही पैशांची बचत करू शकता.
advertisement
दुबई
भारतात आयफोन 16 बेस मॉडेलची किंमत 79 हजार 900 रुपये आहे. हेच मॉडेल दुबईमध्ये 76 हजार 687 रुपयांना उपलब्ध आहे. जर तुम्ही दुबईतून फोन खरेदी केला तर तुम्ही 3 हजार 312 रुपयांची बचत करू शकाल. भारतात आयफोन 16 प्लस 89 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे. तर, दुबईमध्ये त्याची किंमत 85 हजार 712 रुपये आहे.
advertisement
दोन्ही ठिकाणच्या किंमतीमध्ये 4 हजार 188 रुपयांचा फरक आहे. भारतात आयफोन 16 प्रो 1,19,900 रुपयांना मिळत आहे. दुबईमध्ये त्याची किंमत 96,993 रुपये आहे. याचा अर्थ दोन्ही ठिकाणच्या किंमतीमध्ये 22 हजार 907 रुपयांचा फरक आहे. आयफोन 16 प्रो मॅक्स भारतात 1,44,900 रुपयांना उपलब्ध आहे, तर दुबईमध्ये तोच फोन 1,31,719 मध्ये उपलब्ध आहे. हा फोन दुबईमधून मागवून तुम्ही 13 हजार 181 रुपयांची बचत करू शकाल.
advertisement
कॅनडा
कॅनडामध्ये राहणाऱ्या तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकरवी जर तुम्ही आयफोन 16 ऑर्डर केला तर तुम्हाला फक्त 69 हजार 897 रुपये मोजावे लागतील. कॅनडामध्ये 16 सीरिजमधील इतर मॉडेल्स देखील भारताच्या तुलनेत स्वस्त आहेत. कॅनडामध्ये आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स यांची किंमत अनुक्रमे 79 हजार 184 रुपये, 89 हजार 709 रुपये आणि 1 लाख 08 हजार 282 रुपये आहे.
advertisement
अमेरिका
view commentsअमेरिकेत आयफोन 16 बेस मॉडेल 67,096 रुपयांना उपलब्ध आहे. आयफोन 16 प्लस आणि आयफोन 16 प्रो ही दोन मॉडेल्स अनुक्रमे 75 हजार 493 रुपये आणि 83 हजार 891 रुपयांमध्ये विकली जात आहेत. अमेरिकेत आयफोन 16 प्रो मॅक्सची किंमत फक्त 1,00,686 रुपये आहे. अमेरिकेत हे मॉडेल भारतापेक्षा सुमारे 44 हजार रुपयांनी स्वस्त आहे.
Location :
Delhi
First Published :
September 11, 2024 2:55 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
इथं स्वस्तात आहे नवा iPhone 16; तब्बल 1,19,900 रुपयांचा फोन काही हजारांत मिळतोय


