प्रणाली स्वतः हाताने सर्व दागिने तयार करते. 50 रुपयांपासून ती ज्वेलरी विकते आणि तिच्याकडे ब्रायडल सेट, दैनंदिन वापरासाठी ज्वेलरी, लग्नसमारंभासाठी ट्रॅडिशनल डिझाईन्स, कानातले, गळ्यातले विविध खास डिझाईन्स उपलब्ध आहेत.
सोशल मीडियावरून तिच्या ज्वेलरीला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर तिने सरकारी उपक्रम ‘एक स्टेशन, एक उत्पादन’ या योजनेत सहभाग घेतला. या उपक्रमात ती मुंबईतील वेगवेगळ्या स्टेशनवर 15 दिवसांचे स्टॉल लावते आणि प्रवाशांना थेट फॅब्रिक ज्वेलरी विकते.
advertisement
सध्या तिचा स्टॉल दहिसर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सुरू आहे आणि तो 3 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. आज प्रणाली तिच्या कलेच्या जोरावर वर्षाला जवळपास 2 लाखांहून अधिकची कमाई करते. पुढे हा व्यवसाय मोठ्या ब्रँडमध्ये वाढवण्याचं तिचं स्वप्न आहे. स्वतःवर विश्वास ठेवून नोकरी सोडून घेतलेला निर्णय आज तिच्या उद्योजकतेला नवीन दिशा देत आहे.