गेल्या चार वर्षातील सर्वात कमी विकास दर- आर्थिक सर्वेक्षणातील अंदाजानुसार, पुढील वर्षीही आर्थिक परिस्थिती मंदावलेली राहील. चालू आर्थिक वर्षात विकास दर ६.४ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या GDPचा दर ८.२ टक्के होता. त्यामुळे या वर्षातील विकास दर हा चार वर्षातील सर्वात कमी दर आहे.
फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी म्हणाले?
advertisement
उद्या म्हणजे शनिवारी १ फेब्रुवारी रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमधील बदल, पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठे बदल, ग्रामीण विकास आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदी जगातील पाचव्या मोठ्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्याचा अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे.
