Share Market: फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी केली भविष्यवाणी?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stock Market Prediction: शेअर बाजाराता चढ उतार हा सुरूच असतो. अनेकदा मोठ्या घसरणीमुळे मोठे नुकसान होते तर बाजारात तेजी आली तर बंपर नफा देखील होता. अशात एका मोठ्या लेखकाने केलेल्या भविष्यवाणीमुळे सर्वांची झोप उडाली आहे.
नवी दिल्ली: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करणारे असाल, तर तुम्हाला अलर्ट होण्याची गरज आहे. जगभर प्रसिद्ध आणि बेस्टसेलर पुस्तक ‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad)चे लेखक आणि अमेरिकन उद्योजक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी शेअर बाजाराबाबत एक मोठे भाकीत केले आहे. कियोसाकी यांनी अशी भविष्यवाणी केली आहे की, फेब्रुवारी 2025 मध्ये शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होईल.
अमेरिकन उद्योजकाने ट्विटरवर लिहिले की, फेब्रुवारी 2025 मध्ये शेअर बाजारात सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कियोसाकी यांनी 2013 साली लिहिलेल्या ‘रिच डॅड्स प्रॉफेसी’ (Rich Dad’s Prophecy) या पुस्तकात याचा अलर्ट दिला आहे.
असे पॉयझन दिले की, डॉक्टरांना काही कळायच्या आधीच प्रियकराचा मृत्यू झाला
कियोसाकी म्हणाले, रिच डॅड्स प्रॉफेसी-2013 मध्ये मी चेतावणी दिली होती की इतिहासातील सर्वात मोठा स्टॉक मार्केट क्रॅश येणार आहे. हा क्रॅश फेब्रुवारी 2025 मध्ये होईल.यातील चांगली गोष्ट बाजारातील या घसरणीमुळे यावेळी सर्व काही स्वस्त मिळते. या काळात गाड्या आणि घरे आता स्वस्तात मिळतील.
advertisement
In RICH DADs PROPHECY-2013 I warned the buggiest stock market crash in history was coming. That crash will be in February 2025.
Good news because in a crash everything goes on sale. Cars and houses on sale now.
Better news billions will leave the stock and bond markets and…
— Robert Kiyosaki (@theRealKiyosaki) January 27, 2025
advertisement
क्रिप्टो, सोनं आणि चांदीवर पैसे लावा
अमेरिकन उद्योजक पुढे म्हणाले, आणखी एक चांगली बातमी अशी आहे की अब्जावधी रुपये शेअर आणि बाँड मार्केटमधून काढून बिटकॉइनमध्ये गुंतवले जातील. बिटकॉइन झपाट्याने वाढेल. जोपर्यंत संधी आहे, त्याचा फायदा घ्या. फेक गोष्टींपासून दूर राहा आणि क्रिप्टो, सोनं आणि चांदीत गुंतवणूक करा. जरी तुम्ही एक सतोशी (बिटकॉइनची सर्वात लहान युनिट किंवा 0.00000001 बिटकॉइन) विकत घेतली, तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकता, तर लाखो लोक सगळं काही गमावतील. लक्षात ठेवा, रिच डॅड्स प्रॉफेसीमधील भविष्यवाणी खरी ठरत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 27, 2025 6:44 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market: फेब्रुवारी महिन्यात होणार हाहाकार, लाखो लोक सगळं काही गमावतील; कोणी केली भविष्यवाणी?