विश्वासघातकी प्रियसीने दिले सर्वात विषारी पॉयझन; प्रियकर १२ दिवस हॉस्पिटलमध्ये तडफडून मेला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Girlfriend Kill Boyfriend: बॉयफ्रेंडवर विषप्रयोग करून त्याला पद्धतशीरपणे मारून टाकणाऱ्या ग्रीष्माला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ग्रीष्माने शेरॉन राज काय काय केले होते हे सर्व तिच्या गुगल क्लाउडच्या डेटामधून सापडले. या माहितीचा वापर तिला शिक्षा देण्यासाठी झाला.
तिरुवनंतपूरम: आपल्या बॉयफ्रेंडच्या हत्येप्रकरणी ग्रीष्मा नावाच्या तरुणीला केरळमधल्या नेय्याट्टिन्कारा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी फाशीची शिक्षा सुनावली. कोणतेही दृश्य स्वरूपातले पुरावे किंवा प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास अत्यंत अवघड होता. ग्रीष्माने पद्धतशीरपणे माहिती गोळा करून बॉयफ्रेंड शेरॉन राज याला हळूहळू विषबाधा घडवून आणून त्याला ठार केलं होतं. या तपासात तिने केलेल्या गुगल सर्चेसचा पुरावा म्हणून उपयोग झाला. तिने अत्यंत थंड डोक्याने आपल्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूची कथा लिहिली आणि ती अमलात आणली. अत्यंत थरकाप उडवणाऱ्या या कथेबद्दल आणि तपासाबद्दल जाणून घेऊ या.
कोर्टाने या प्रकरणी ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावली असून, तिची आई सिंधू हिला निर्दोष मुक्त केले आहे. तर तिचे काका निर्मलकुमारन नायर याला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा आरोप त्यांच्यावर होता.
प्रेमाची सुरुवात...
तमिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातल्या देवीयोडू गावातली ग्रीष्मा हिची तमिळनाडू-केरळ सीमेवरच्या पारासला गावातल्या शेरॉनशी 2021 साली बसमधून कॉलेजला जाताना ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध बहरले; मात्र कुटुंबीयांना याची कल्पना नव्हती. ग्रीष्माच्या कुटुंबीयांनी मार्च 2022मध्ये लष्करातल्या एका जवानाशी तिचं लग्न ठरवलं. तोपर्यंत ती शेरॉनसोबतच होती; मात्र आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचे फायदे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने शेरॉनला सोडून द्यायचं ठरवलं.
advertisement
कुंडलीत पहिला पती मरण्याचा योग...
2022मध्ये या प्रकरणाचा तपास करणारे मुख्य अधिकारी आणि आता कासारगोडचे पोलीस उपाधीक्षक असलेल्या के. जे. जॉन्सन यांनी सांगितलं, की 'शेरॉनला नोकरी नसल्याने ती त्याला टाळू इच्छित होती. ग्रीष्मा ही हिंदू नायर या उच्च वर्गातली होती, तर शेरॉन हा ख्रिश्चन नाडर हा मागासवर्गातला होता. या सगळ्या कारणांमुळे तिने शेरॉनपासून दूर राहायचं ठरवलं. तिने अनेक मार्ग अवलंबले. आपल्या कुंडलीत पहिला पती मरण्याचा योग आहे, असंही तिने त्याला सांगितलं; मात्र शेरॉन हे काहीच मानायला तयार नव्हता.'
advertisement
प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ...
आपले प्रायव्हेट फोटो, व्हिडिओज शेरॉनकडून लीक होतील, याची ग्रीष्माला भीती होती. म्हणूनच तिने अखेर त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती 22 वर्षांची होती. ऑगस्ट 2022मध्ये ग्रीष्माने 'पॅरासिटामॉल पॉयझनिंग' या विषयाबद्दल गुगलवर खूप सर्च केलं. नंतर तिने त्याला कन्याकुमारीतल्या नेय्यूर इथल्या त्याच्या कॉलेजमध्ये भेटायला सांगितलं. तिथे तिने त्याला 50 पॅरासिटामॉल टॅब्लेट्स मिसळलेली ज्यूस बाटली दिली आणि ज्यूस चॅलेंज स्वीकारण्याचं आव्हान दिलं. ते खूप कडू असल्याने त्याने ते नाकारलं; मात्र त्या चॅलेंजचा व्हिडिओ शूट करण्यात आला होता. त्याच्या मृत्यूनंतर तो खूप व्हायरल झाला.
advertisement
13 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्माने त्याला आकर्षित करून घेण्यासाठी कॉल करून त्याच्याशी ती तासभर बोलली. दुसऱ्या दिवशी तिच्या घरी कोणी नसल्याने त्याने तिच्या घरी येण्याचं आमंत्रण तिने दिलं. त्या दिवशी आर. एस. रेजिन या मित्राबरोबर शेरॉन तिच्या घरी आला. तो नंतर या केसमधला साक्षीदार ठरला.
पद्धतशीरपणे प्लॅनिंग
शेरॉन येईपर्यंत ग्रीष्माने तणनाशक (हर्बिसाइड) म्हणून वापरल्या जाणाऱ्या पॅराक्वाट या रसायनाबद्दल बरीच माहिती गुगल सर्चेसद्वारे गोळा करून ठेवली होती. पॅराक्वाट हे स्लो पॉयझन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तिने कापिक या ट्रेडनेमचं हर्बिसाइड विकत घेतलं. त्यात पॅराक्वाट हा घटक असतो. हे हर्बिसाइड तिचे शेतकरी काका निर्मलकुमारन नायर यांनी त्यांच्या घरात ठेवलं. त्यानंतर तिने एक आयुर्वेदिक काढा तयार करून त्यात हे हर्बिसाइड मिसळलं आणि ते चॅलेंज म्हणून शेरॉनला प्यायला दिलं.
advertisement
त्याचा कडवटपणा दूर करण्यासाठी तिने त्याला ज्यूसही प्यायला दिला. त्याने हे सगळं करावं म्हणून ती त्याला इंटिमेंट मेसेजेसही करत होती, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.
शेरॉन ते प्यायला, पण त्याला उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथून त्याला तिरुअनंतपुरमच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं. नंतर ग्रीष्माने आपल्यालाही उलट्या झाल्याचं शेरॉनला मेसेजद्वारे कळवलं. तातडीने वैद्यकीय ट्रीटमेंट घेण्यापासून त्याला परावृत्त करण्याचा हा तिचा प्रयत्न असावा असा अंदाज आहे.
advertisement
पोलीस अधिकारी जॉन्सन यांनी सांगितलं, की त्याने काढा प्यायल्यानंतर ग्रीष्माने त्याला बरेच मेसेज केले. आपलं काम फत्ते होतंय की नाही, हे तिला जाणून घ्यायचं होतं.
मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सना शेरॉनच्या आजारपणाचं कारण लक्षात येईना. कारण त्याच्या दोन्ही किडन्या बाद झाल्या. पॅराक्वाटचे काही अंश शिल्लक राहत नसल्याचे त्याच्या रक्तात त्याचा काही पुरावा सापडला नाही. अन्नातूनही विषबाधा झाली नव्हती. डायलिसिस करूनही काही उपयोग झाला नाही.
advertisement
पॅराक्वाटची विषबाधा झाल्यानंतर फुफ्फुसं निकामी होतात. अन्ननलिकेला छिद्रं पडू शकतात. त्यामुळे दाह होतो. छातीत इन्फेक्शन होतं किंवा किडनी बाद होते. पोस्टमॉर्टेम केलेल्या फॉरेन्सिक सर्जननी शेरॉनच्या मृत्यूचं कारण फुफ्फुसांना झालेली तीव्र दुखापत हे नोंदवलं आहे. हे पॅराक्वाट पॉयझनिंगचं लक्षण आहे. 23 वर्षांचा शेरॉन अखेर 25 ऑक्टोबर 2022 रोजी त्याचे निधन झाले.
हे प्रकरण उलगडण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल शेरॉनचा भाऊ शिमॉन राज याच्यामुळे पडलं. तो आयुर्वेदिक डॉक्टर असून, त्याला ग्रीष्माशी शेरॉनच्या असलेल्या रिलेशनशिपबद्दल माहिती होतं. ग्रीष्माकडे शेरॉन काढा प्यायला होता, असं त्याला कळलं. त्याने त्याबद्दलचे तपशील मागितले; मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी ते प्रिस्क्राइब केलं होतं, असं तिने खोटंच सांगितलं. तिने औषधाचं नाव सांगायला नकार दिला. पाठदुखीसाठी आपण स्वतःही तोच काढा प्यायला होता आणि त्या वेळी काही समस्या उद्भवली नव्हती, असंही तिने त्याला खोटंच सांगितलं. शिमॉन राज याने हे तिचे हे सारे कॉल्स रेकॉर्ड केले होते. ते त्याने पोलिसांकडे सुपूर्द केले.
गेल्या आठवड्यात निकाल घोषित करताना कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं, की 'गुगल सर्चमध्ये ग्रीष्माने जे पाहिलं होतं तशा वैद्यकीय स्थितीत शेरॉन जाऊन पोहोचला. पोस्टमॉर्टेम अहवालात असं नोंदवण्यात आलं आहे, की त्याच्या पेनिसमधूनही रक्तस्राव होत होता. त्याच्या अगदी ओठांपासून गुदद्वारापर्यंत शरीरात सर्वत्र प्रचंड वेदना होत होत्या. हे सारं त्या विषामुळे घडलं.'
यात प्रत्यक्षदर्शी कोणीही नव्हतं. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांसाठी पुरावे गोळा करणं हे मोठं आव्हान होतं. त्यांनी गुगल क्लाउडचा डेटा, त्या दोघांच्या मोबाइल्सची लोकेशन्स, कॉल रेकॉर्ड्स, व्हॉट्सॅप चॅट्स, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ कॉल्स आणि फॉरेन्सिक्स या साऱ्यांची सांगड घालून गुन्ह्याचा तपास केला आणि निष्कर्ष काढला.
'क्लाउडमधल्या देवाने (गुगल क्लाउड) गुन्ह्याचा डेटा सेव्ह केला होता. कोणीही गुन्हेगार पुरावा मागे सोडल्याशिवाय गुन्हा करूच शकत नाही. शेरॉनला 11 दिवस आयुष्यासाठी झुंजावं लागलं आणि तेही पाण्याचा एकही थेंब न पिता....,' असं नेय्याट्टिन्कारा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. बशीर यांनी ग्रीष्माला मृत्युदंड सुनावताना सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 4:26 PM IST
मराठी बातम्या/देश/
विश्वासघातकी प्रियसीने दिले सर्वात विषारी पॉयझन; प्रियकर १२ दिवस हॉस्पिटलमध्ये तडफडून मेला