advertisement

Maharashtra News: राजकारणात मोठी घडामोड, ठाकरे-शिंदे एकत्र, भाजप-राष्ट्रावादीचा झाला गेम, कुठं झाली उलथापालथ?

Last Updated:

Pune Junnar Panchayat Samiti: मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू आल्यानंतर शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती. आता पुणे जिल्ह्यात मोठी घडामोड झाली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, ठाकरे-शिंदे एकत्र, भाजप-राष्ट्रवादीचा झाला गेम, कुठं झाली उलथापालथ?
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, ठाकरे-शिंदे एकत्र, भाजप-राष्ट्रवादीचा झाला गेम, कुठं झाली उलथापालथ?
पुणे: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकमेकांवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी न दडवणारे शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आल्याची घटना घडली आहे. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू आल्यानंतर शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली होती. आता पुणे जिल्ह्यात मोठी घडामोड झाली आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपला सत्तेपासून दूर राहवं लागलं आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपला डावलून जुन्नर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही गटांनी हातमिळवणी केली आहे. या 'शिवसेना-शिवसेना' युतीमुळे भाजप सत्तेपासून दूर राहिली असून, पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे.
advertisement

सत्तास्थापनेचे समीकरण आणि धक्कातंत्र

जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने सत्ता कोणाची येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जुन्नर पंचायत समितीमध्ये
शिवसेना शिंदे गटाचे ८ सदस्य, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ६ सदस्य, भाजप आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एक सदस्य आहेत.
शिवसेना (शिंदे) गटाला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ एका मताची गरज होती. सर्वांना वाटले होते की महायुतीचा धर्म पाळत ते भाजपची साथ घेतील, मात्र शिंदे गटाने थेट ठाकरे गटाच्या सदस्याला सोबत घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
advertisement

पंचायत समितीचे नवे कारभारी

या नव्या युतीनुसार, सभापती पदावर शिवसेना (शिंदे) पक्षाच्या कमल शेळकंदे यांची वर्णी लागली आहे. तर, उपसभापती पदासाठी शिंदे गटाने ठाकरे गटाला झुकते माप दिले असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अमित ढोले यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे.

वरिष्ठांच्या संमतीनेच निर्णय, आमदार शरद सोनवणेंची कबुली

विजयानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शरद सोनवणे म्हणाले की, "जुन्नर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकवणे हेच आमचे मुख्य ध्येय होते. उपसभापती पदाबाबत वरिष्ठांशी सविस्तर चर्चा करूनच अमित ढोले यांना संधी देण्यात आली आहे." दरम्यान, उपसभापती अमित ढोले यांनी स्पष्ट केले की, जरी सत्तेसाठी पाठिंबा दिला असला, तरी आपण शिवसेना (ठाकरे) पक्षातच राहणार आहोत.
view comments
मराठी बातम्या/Local Body Elections/
Maharashtra News: राजकारणात मोठी घडामोड, ठाकरे-शिंदे एकत्र, भाजप-राष्ट्रावादीचा झाला गेम, कुठं झाली उलथापालथ?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement