क्रुरतेचा कळस! माजी सैनिकाकडून पत्नीची हत्या, कुकरमध्ये शिजवले अन् ...; प्रकार पाहून पोलीस देखील हादरले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Ex-Armyman Kills Wife: तेलंगणामधील हैदराबाद येथील जिलेलगुडा भागात माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे प्रेशर कुकरमध्य शिजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हैदराबाद: येथील जिलेलगुडा भागात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माजी सैनिकाने आपल्या पत्नीची हत्या करून तिचे शरीराचे तुकडे केले आणि तुकड्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर तलावात फेकून दिले. गुरुमूर्ती असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी पुट्टवेंकटा माधवी (35) हिचा हत्या केल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले.
ही घटना मीरपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत पुट्टवेंकटा माधवीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गुरुमूर्तीला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत गुरुमूर्तीने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मीरपेटचे निरीक्षक नागराजू यांनी सांगितले की, आरोपीने सांगितले की त्याने पत्नीचे अवशेष शिजवल्यानंतर त्याची पावडरच्या स्वरूपात बनवून तलावात टाकले. दरम्यान पोलिसांनी आरोपी गुरुमूर्तीने केलेल्या दाव्यावरून तपास सुरु केला आहे.\
advertisement
घटना कशी घडली?
गुरुमूर्ती आणि माधवी हे आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी 10 वर्षांपूर्वी लग्न केले होते. ते गेल्या पाच वर्षांपासून जिलेलगुडा येथे दोन मुलांसह राहत होते.गुरुमूर्ती हा निवृत्त सैनिक असून सध्या कंचनबाग येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. माधवीची आई उप्पाला सुब्बम्मा यांनी 18 जानेवारीला तक्रार दाखल केली की, 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर माधवी दुपारी 12 च्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेली आणि परत आली नाही. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही.
advertisement
आपण कधी सुधारणार? नीरज चोप्राच्या पत्नीबद्दल Googleवर पाहा काय सर्च केले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुमूर्तीने चौकशीत सांगितले की- पत्नीने नंद्याल येथे माहेरी जाण्याचा आग्रह धरल्याने त्याला लाग आला आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. पोलिस सध्या आरोपीच्या दाव्यांची सत्यता तपासत आहेत. अद्याप पीडित महिलेचा मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू असून आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Location :
Hyderabad,Telangana
First Published :
January 23, 2025 3:56 PM IST
मराठी बातम्या/देश/
क्रुरतेचा कळस! माजी सैनिकाकडून पत्नीची हत्या, कुकरमध्ये शिजवले अन् ...; प्रकार पाहून पोलीस देखील हादरले