Neeraj Chopra Wife: आपण कधी सुधारणार? नीरज चोप्राच्या पत्नीबद्दल Googleवर पाहा काय सर्च केले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Neeraj Chopra Wife Himani Mor: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दोन दिवसांपूर्वी हिमानी मोरशी विवाह केल्याची बातमी सोशल मीडियावरून सर्वांनी दिली. नीरजने अचानक केलेल्या या घोषणेमुळे सर्वांना धक्का बसला. त्याची पत्नी हिमानीबद्दल माहिती घेण्यासाठी सर्वांनी गुगलचा आधार घेतला.
नवी दिल्ली: क्रिकेट वेड्या भारतात अन्य खेळातील खेळाडूंना फार लोकप्रियता मिळत नाही. मात्र भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने या गोष्टीला धक्का दिला. देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तीक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजच्या नावावर दोन ऑलिम्पिक पदके आहेत. त्याचे चाहते फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत. नीरजचे मैदानावर आणि मैदानाबाहेरचे वर्तन इतके विनम्र आहे की त्याच्यावर टीका करण्याचा कोणी विचार करत नाही.
दोन दिवसांपूर्वी नीरजने विवाहाची बातमी सर्वांनी दिली आणि अनेक मुलींचे हृदय तुटले. ऑलिम्पिकची दोन पदके जिंकलेल्या या जेव्हलिन थ्रोअरने अचानक रात्री त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली. यापूर्वी नीरजचे नाव भारताची स्टार नेमबाज मनु भाकरसोबत जोडले गेले होते. मात्र दोघांनीही या वृत्ताचे खंडन केले.
advertisement
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
नीरजच्या या घोषणेनंतर हिमानी मोरबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक झाले. सोशल मीडियावर माहिती न मिळाल्याने लोकांनी Googleचा आधार घेतला. हिमानीबद्दल शोधलेल्या गोष्टी चकित करणाऱ्या होत्या. कोणी त्यांच्या फोटो पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तर कोणी त्यांच्या वडिलांबद्दल माहिती शोधली. लोकांनी हिमानी मोर यांच्या जाती बद्दलदेखील शोध घेतला.
advertisement
Google काय सर्च केले
हिमानी मोर टेनिस
हिमानी मोर जात
हिमानी मोर कोण आहे?
हिमानी मोर वय
हिमानी मोर टेनिस प्लेअर
हिमानी मोर वय (Age)
Himani Mor Instagram
Himani Mor Picture
Himani Mor Net Worth
Himani Mor Biography
कोण आहे हिमानी मोर
25 वर्षीय हिमानी मोर मुळची सोनीपतच्या असून ती एक टेनिसपटू आहे. तिने लिटिल एंजल्स स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या हिमानी न्यू हॅम्पशायरमधील फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स मॅनेजमेंट मध्ये मास्टर्सची पदवी घेत आहेत. तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊसमधून पॉलिटिकल सायन्स आणि फिजिकल एज्युकेशनमध्ये पदवी घेतली आहे. हिमानीचा भाऊ हिमांशू एक टेनिसपटू आहे. दिल्ली विद्यापीठाकडून त्याने राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला आहे. 2017 मध्ये तैपेईमध्ये झालेल्या विश्व विद्यापीठ खेळांमध्ये भाग घेतला होता. तर 2016 मध्ये मलेशियामध्ये झालेल्या जूनियर टेनिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Neeraj Chopra Wife: आपण कधी सुधारणार? नीरज चोप्राच्या पत्नीबद्दल Googleवर पाहा काय सर्च केले