India vs Pakistan Rivalry: भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती; स्कोअर कार्ड पाहिला का?

Last Updated:

IND vs PAK First Cricket Test Match: भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मॅच नेहमी हायव्होल्टेज होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांची लढत 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोन्ही संघातील क्रिकेट Rivalry मध्ये पहिली मॅच कधी झाली होती आणि त्यात कोणी बाजी मारली होती ते जाणून घ्या...

IND vs PAK First Cricket Test Match
IND vs PAK First Cricket Test Match
मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. 19 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेला सुरूवात होईल आणि संपूर्ण जग प्रतिक्षा करत असलेली स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज लढत 23 फेब्रुवारी रोजी अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल. या दोन्ही देशातील लढतींची वाट फक्त दोन देशातील क्रिकेट चाहते नाही तर संपूर्ण जगातील चाहते करत असतात. दोन्ही देशातील राजकीय वादामुळे त्याचे पडसाद क्रिकेट मैदानावर अगदी पहिल्या सामन्यापासून दिसत आहेत. सध्या दोन्ही देशात द्विपक्षीय क्रिकेट होत नसले तरी आयसीसीच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांच्याविरुद्ध लढतात.
23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीची वाट सर्व क्रिकेट चाहते पाहत आहेत. भारत-पाकिस्तान लढतीची ही क्रेझ आज नव्हे तर अनेक दशकांपासून सुरू आहे. भारत विरुद्ध पाकिस्तानची ही क्रिकेट Rivalryचा इतिहासात आज जाणून घेऊयात दोन्ही देशातील पहिली लढत कधी झाली होती आणि या लढतीचा निकाल काय होता?
प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला, जिंकला खो खो वर्ल्डकप
ब्रिटीशांनी देश सोडताना भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी केली. 1947 मध्ये दोन नव्या देशांची निर्मिती झाली खरी पण त्यांच्यातील पहिल्या क्रिकेट सामन्यासाठी 1952 साला उजडावे लागले. दोन्ही देशातील पहिली मॅच ही कसोटी फॉर्मेटमधील होती.
advertisement
16 ते 18 ऑक्टोबर दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झाली. या सामन्यात भारताचे कर्णधार लाला अमरनाथ तर पाकिस्तान संघाचे कर्णधार अब्दुल कारदार होते. लाल अमरनाथ यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने पहिल्या डावात 372 धावा केल्या. भारताकडून हेमू अधिकारी यांनी नाबाद 81, विजय हजार यांनी 76 तर विजय मांजरेकर यांनी 23 धावांचे योगदान दिले.
advertisement
भारताच्या 372 धावांच्या उत्तरादाखल पाकिस्तानचा डाव फक्त 150 धावांत संपुष्ठात आला आणि भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पाकवर फॉलोऑनची नामुष्की आली. दुसऱ्या डावात देखील पाकिस्तानचा डाव गडगडला आणि ते फक्त 152 धावा करून बाद झाला. या ऐतिहासिक कसोटीत भारताने एक डाव आणि ७० धावांनी विजय मिळवला.
advertisement
या कसोटीत पाकिस्तानची दाणादाण उडवली होती ती भारताचे गोलंदाज वीनू मांकड यांनी होय. मांकड यांनी पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात ५ विकेट घेतल्या होत्या.
या दौऱ्यात दोन्ही संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका झाली होती. ज्यातील पहिली कसोटी भारताने तर दुसरी कसोटी पाकिस्तानने जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यानंतर मुंबईतील ब्रेबॉर्न मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने पाकिस्तानचा 10 विकेटनी पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील चौथी आणि पाचवी कसोटी ड्रॉ झाली. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India vs Pakistan Rivalry: भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती; स्कोअर कार्ड पाहिला का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement