Cricket: भारताच्या पोरींचा T-20 वर्ल्डकपमध्ये धमाका, फक्त 26 चेंडूत संपवली मॅच
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Under 19 Womens T20 World Cup 2025: आयसीसी 19 वर्षाखालील महिलांच्या टी-20 वर्ल्डकपमधील पहिल्याच सामन्यात भारताच्या संघाने वेस्ट इंडिजवर धमाकेदार विजय मिळवला. गतविजेत्या टीम इंडियाने ही लढत फक्त 26 चेंडूत जिंकली.
नवी दिल्ली: मलेशिया येथे काल म्हणजे १८ जानेवारीपासून आयसीसी महिला अंडर-19 टी20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून भारताच्या महिला संघाने पहिल्या वर्षी विजेतेपद मिळवले होते. आता यावर्षी भारताच्या महिला संघाने धमाकेदार विजयाने स्पर्धेची सुरुवात केली आहे.
विद्यमान विजेत्या भारताने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाचा भारताने एकतर्फी सामन्यात 9 गडी राखून पराभव केला. परुनिका सिसोदियाच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजला फक्त 44 धावांवर गुंडाळले. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत 26 चेंडूत लक्ष्य पूर्ण करून सामना जिंकला.
ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकरवर दुःखाचा डोंगर कोसळला; प्रिय व्यक्तींना गमावले
भारताने आयसीसी महिला अंडर-19 टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी करत पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजला पराभूत केले. भारतीय कर्णधार निकी प्रसादने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी अचूक ठरवत वेस्ट इंडीजची संपूर्ण फलंदाजी अवघ्या 14 षटकांत संपवली. वेस्ट इंडिज संघातील 11 पैकी 9 फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतासाठी परुनिका सिसोदियाने अप्रतिम गोलंदाजी करत सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय आयुषी आणि जोसिथाने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले.
advertisement
रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला...
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर झटका बसला. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर गोंगडी त्रिशा बाद झाली. पहिल्या षटकात विकेट पडल्यानंतर भारतीय फलंदाजांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. भारताच्या जी. कमलिनी (16) आणि सानिका चाळके (18) यांनी आक्रमक खेळ करत सहज विजय मिळून दिला.
advertisement
स्पर्धेत भारत अ गटात असून या गटात श्रीलंका, मलेशिया आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. स्पर्धेत एकूण 16 संघ असून त्यांना 4 गटात विभागण्यात आले आहे. गटफेरीतील प्रत्येकी 3 संघ सुपर 6 फेरीत पोहोचतील.भारताची दुसरी मॅच 21 जानेवारी रोजी मलेशियाविरुद्ध होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 19, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket: भारताच्या पोरींचा T-20 वर्ल्डकपमध्ये धमाका, फक्त 26 चेंडूत संपवली मॅच