advertisement

रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला, मला आता बसावे लागेल

Last Updated:

Rohit Sharma Secret Chat Video Leak: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघाची शनिवारी घोषणा करण्यात आली. यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद सुरू होण्याआधी रोहितचा आगरकर सोबत बोलतानाचा एक व्हिडिओ लीक झालाय.

rohit sharma and ajit agarkar
rohit sharma and ajit agarkar
मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजीत आगरकर यांचा एक गुप्त चॅट व्हिडिओ लीक झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत झाली. ही पत्रकार परिषद सुरू होण्याआधी रोहित आणि आगरकर बोलत होते. तेव्हाच्या संवादाचा व्हिडिओ लीक झाला असून तो सध्या व्हायरल होतोय.
संघाची घोषणा करण्यासाठी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्याआधी दोघे हे विसरले असावेत की माईक ऑन आहे. यादरम्यान, रोहित अजीत आगरकरला बोलत होता की, या पत्रकार परिषदेनंतर सेक्रेटरीसोबत एक ते दीड तास बसावे लागेल. थोडी चर्चा करावी लागले. या सर्व गोष्टी... फॅमिली-व्हॅमिलीचा मुद्दा डिस्कस करण्यासाठी, आता सर्वजण मला म्हणत आहेत की... तोपर्यंत कोणी तरी आल्याने रोहित बोलायचे थांबला. बीसीसीआयने अलीकडेच खेळाडूंसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. ज्यामध्ये कुटुंबाशी संबंधित काही नवीन नियम बनवले गेले आहेत. रोहित याबद्दल आगरकरशी चर्चा करत होता. मात्र तो ही गोष्ट विसरला की माईकने सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
advertisement
बीसीसीआयच्या नवीन नियमांबद्दल
बीसीसीआयने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या नवीन नियमांमध्ये एक नियम असा आहे की सर्व खेळाडूंना टीम बसमध्येच प्रवास करावा लागेल. म्हणजेच, दौऱ्यावर खेळाडू त्यांच्या कुटुंबासोबत प्रवास करू शकणार नाहीत. जर कोणी खेळाडू या नियमाचे उल्लंघन करताना सापडला, तर त्याला दंड भरावा लागेल. जर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत वेगळा प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीच्या अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागेल. रोहित आणि अजीत आगरकर यांच्या 20 सेकंदांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
advertisement
रोहित-अगरकर यांचा संवाद
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा अजीत आगरकर यांच्याशी या नियमावर चर्चा करत होते. रोहित म्हणाला “मला अजून एक-दीड तास तिथे सेक्रेटरीसोबत बसावे लागेल, फॅमिलीचं डिस्कस करण्यासाठी. सगळे मला सांगत आहेत यार.” या संभाषणाचा 20 सेकंदांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
advertisement
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार) शुभमन गिल (उप-कर्णधार),विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला, मला आता बसावे लागेल
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement