Champions Trophy 2025 India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला संधी मिळाली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Champions Trophy 2025 India Squad Live Updates: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा होणार आहे. निवड समिती इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ही संघ जाहीर करणार आहे.
मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे . कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या बैठकीत भारतीय संघाची निवड झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीसह निवड समितीने इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला जाणार आहे. भारतीय संघाच्या निवडीचे सर्व अपडेट जाणून घ्या...
चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघाची घोषणा लाइव्ह अपडेट: (India’s Champions Trophy 2025 squad announcement Live Updates)
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल,
हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा हर्षित राणा
advertisement
> भारतीय संघात 6 फलंदाज, 4 ऑलराउंडर, एक फिरकीपटू, 3 जलद गोलंदाज, एक विकेटकीपर
> चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा
advertisement
Indian Cricket Team for Champions Trophy: Rohit Sharma (C), Virat Kohli, S Gill (VC), S Iyer, KL Rahul, Hardik Pandya, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Jasprit Bumrah, M Shami, Arshdeep, Y Jaiswal, R Pant and R Jadeja. pic.twitter.com/GBuEWg82rc
— ANI (@ANI) January 18, 2025
advertisement
> दोन तास झाले रोहित शर्मा आणि निवड समितीची बैठक सुरूच
> चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ जणांच्या भारतीय संघाची निवड केली जाऊ शकते.
> स्पर्धेतील दोन संघ ग्रुपमध्ये असून साखळी फेरीनंतर दोन ग्रुपमधील अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील.
> वानखेडे स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांची बैठक अद्याप सुरू
advertisement
> चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सेमीफायनलच्या लढती आणि फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवला आहे.
>भारताची पहिली लढत 20 फेब्रुवारी रोजी बांगालेदशविरुद्ध होणार आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान आणि 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध मॅच होणार आहे.
>चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरूवात 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारतीय संघ ग्रुप बी मध्ये असून या ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत.
advertisement
>चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्व देशांना त्यांचे संघ जाहीर करण्यासाठी आयसीसीने १२ जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. हे संघ फक्त 'तात्पुरते' असतील. सर्व देशांना १३ फेब्रुवारीपर्यंत संघात बदल करता येतील.
>चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा नववा हंगाम आहे. याआधी 2017मध्ये ही स्पर्धा झाली होती आणि तेव्हा भारताचा पराभव करून पाकिस्तानने विजेतेपद मिळवले होते. भारताने 2013 साली विजेतेपद, तर 2002 साली श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेपद मिळवले होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 18, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Champions Trophy 2025 India Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला संधी मिळाली