पुण्याच्या प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला, पहिल्यांदाच जिंकला खो खो वर्ल्डकप

Last Updated:

India Won Kho Kho World Cup: दिल्लीत झालेल्या खो खो वर्ल्डकप फायनलमध्ये भारताने नेपाळवर नेत्रदीपक विजय मिळवत पहिल्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. पुण्याच्या प्रियांका इंगळेने भारताच्या संघाचे नेतृत्व केले.

News18
News18
नवी दिल्ली: वेग, रणनिती आणि कौशल्याच्या जोरावर भारताच्या महिला संघाने खो खो वर्ल्डकपमध्ये इतिहास घडवला. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा ७८ विरुद्द ४० अशा फरकाने पराभव करत पहिल्यांदाच खो खो वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले.
प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित कामगिरी करत गटसाखळी आणि नॉकआउट फेरीत दबदबा निर्माण केला होता. अंतिम सामन्यात त्यांना आव्हान देण्यासाठी ओळखीचा प्रतिस्पर्धी नेपाळच होता. दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रभावी विजय मिळवल्यानंतर आता चषक जिंकण्यासाठी शेवटचा सामना उरला होता.
नेपाळने नाणेफेक जिंकून भारताला पहिल्यांदा आक्रमण करण्यास सांगितले. मात्र हा निर्णय त्यांच्यावरच उलटला, कारण भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत वेगाने गुण मिळवले आणि नेपाळला दबावाखाली ठेवले.
advertisement
Cricket: भारताच्या पोरींचा T-20 वर्ल्डकपमध्ये धमाका, फक्त 26 चेंडूत संपवली मॅच
भारताने पहिल्या टप्प्यातच नेपाळच्या सरस्वती, पूजा आणि दीपा यांना फक्त 50 सेकंदांत बाद केले आणि सामन्याची लय ठरवली. नेपाळच्या पुनम, निशा आणि मनमती यांनी खेळाचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय महिला संघाने सातत्याने आक्रमण करत गुणांची भर घातली. कर्णधार इंगळेने केलेल्या दुहेरी बादामुळे भारताने पहिली फेरी संपल्यानंतर 34-0 अशी मोठी आघाडी घेतली होती.
advertisement
नेपाळला सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय आक्रमणाला तोडीस तोड उत्तर देणे आवश्यक होते. मात्र भारताच्या चैतरा, वैश्‍नवी आणि इंगळे यांनी त्यांचे डावपेच हाणून पाडले. चैतऱ्याने केलेल्या प्रभावी बचावामुळे नेपाळचे खेळाडू तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ धावण्यात अडकले ज्यामुळे भारताला ड्रीम रन मिळाला.
रोहित शर्माचा 20 सेकंदांचा सिक्रेट चॅट व्हिडिओ लीक; आगरकरला म्हणाला...
नेपाळने काही प्रमाणात कमबॅक करत भारताची आघाडी थोडी कमी केली. मात्र इंगळे आणि सहकाऱ्यांच्या वेगाने त्यांच्या आशा पुन्हा धुळीस मिळवल्या. दुसऱ्या फेरीच्या शेवटी भारत 35-24 च्या आघाडीत होता. तिसऱ्या फेरीत भारतीय महिला संघाने आक्रमण करत नेपाळच्या सहा गटांना बाद केले आणि 73-24 अशी भक्कम आघाडी घेतली.
advertisement
नेपाळला सामना जिंकण्यासाठी चमत्काराची गरज होती. मात्र भारताच्या खेळाडूंसमोर त्याचे काहीही चालले नाही. भारतीय महिला संघाने 78-40 च्या फरकाने नेत्रदीपक विजय साकारला. भारताचे खो-खो वर्ल्ड कपचे पहिले विजेतेपद आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पुण्याच्या प्रियांका इंगळेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास घडवला, पहिल्यांदाच जिंकला खो खो वर्ल्डकप
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement