Cricket News: वैष्णवीची हॅट्ट्रिक! वर्ल्डकपमध्ये भारताचा सनसनाटी विजय, फक्त 17 चेंडूत केला यजमान देशाचा पराभव
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Icc U19 Women T20 World Cup: महिलांच्या 19 वर्षाखालील टी20 वर्ल्डकप भारतीय क्रिकेट संघाचा धमाका सुरूच आहे. पहिल्या सामन्यात 32 चेंडूत विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने दुसरी मॅच फक्त 17 चेंडूत जिंकली आणि सुपर 6 मधील स्थान निश्चित केले.
नवी दिल्ली: मलेशियात सुरू असलेल्या आयसीसी महिलांच्या 19 वर्षाखालील टी20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने दमदार प्रदर्शन सुरू ठेवले आहे.पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स आणि 26 चेंडूत विजय मिळवल्यानंतर भारताने आता दुसऱ्या सामन्यात देखील धमाकेदार विजय मिळवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
19 वर्षाखालील टी20 वर्ल्डकपमध्ये भारताने यजमान मलेशियाला 10 विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने सुपर सिक्स फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताच्या वैष्णवी शर्माने पदार्पणातच हॅट्ट्रिकसह 5 विकेट्स घेतल्या. तिच्या भेदक गोलंदाजीमुळे मलेशियाचा संघ केवळ 31 धावांवर गारद झाला. त्यानंतर भारताने फक्त 2.5 षटकांत म्हणजे 17 चेंडूंमध्ये एक ही विकेट न गमावता विजय मिळवला.
advertisement
भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तानने लाज काढून घेतली होती
मलेशिया विरुद्धच्या लढतीत भारतीय कर्णधार निक्की प्रसादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला फक्त 44 धावांवर रोखणारी भारतीय गोलंदाजी मलेशियाच्या विरुद्ध आणखी भेदक ठरली. यजमान संघाचे 5 फलंदाज 25 धावा होण्याआधी तंबूत परतले होते. त्यानंतर वैष्णवी शर्माने विश्वचषकातील पदार्पण सामन्यात हॅट्ट्रिक घेत मलेशियाच्या खालच्या फळीकडील फलंदाजांचा धुव्वा उडवला. वैष्णवीने 4 षटकांत फक्त 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तर आयुषी शुक्लाने 3 विकेट्स घेतल्या, तर जोशिता हिने 1 विकेट मिळवली.
advertisement
कुंभ मेळ्यातील IIT बाबांना बाहेर काढले, अखाड्याने म्हटले, संन्यासामध्ये...
भारतीय गोलंदाजीसमोर मलेशियाचा संघ 14.3 षटकांत फक्त 31 धावा करू शकला. 32 धावांचे सोपे लक्ष्य भारतीय संघाने फक्त 17 चेंडूत पार केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त एक चौकार मारून बाद झालेली ओपनर गोंगाडी त्रिशा हिने मलेशियाविरुद्ध शानदार खेळ केला. तिने 12 चेंडूंमध्ये 5 चौकार लगावत नाबाद 27 धावा केल्या आणि सामना काही मिनिटांत संपवून टाकला.
advertisement
Cricket: भारताच्या पोरींचा T-20 वर्ल्डकपमध्ये धमाका, फक्त 26 चेंडूत संपवली मॅच
Debut ✅
Hat-trick ✅
Five wickets ✅
Vaishnavi Sharma etched her name in the record books 📚✏️
Scoreboard ▶️ https://t.co/3K1CCzgAYK#TeamIndia | #MASvIND | #U19WorldCup pic.twitter.com/NfbBNNs3zw
— BCCI Women (@BCCIWomen) January 21, 2025
advertisement
भारतीय संघाने वेस्ट इंडिजला 44 धावांवर रोखून 26 चेंडूंमध्ये सामना संपवला होता. मलेशियाविरुद्धही 2.5 षटकांत मॅच जिंकून गतविजेत्या भारतीय संघाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली.
या स्पर्धेचा हा दुसरा हंगाम असून पहिल्या हंंगामात भारताने इंग्लंडचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. या वर्षी भारत अ गटात असून या गटात श्रीलंका, मलेशिया आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. स्पर्धेत एकूण 16 संघ असून त्यांना 4 गटात विभागण्यात आले आहे. गटफेरीतील प्रत्येकी 3 संघ सुपर 6 फेरीत पोहोचतील.भारताची पुढील मॅच 23 जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket News: वैष्णवीची हॅट्ट्रिक! वर्ल्डकपमध्ये भारताचा सनसनाटी विजय, फक्त 17 चेंडूत केला यजमान देशाचा पराभव