Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात तब्बल 22 महिन्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Porsche Car Accident Vishal Agarwal granted Bail : पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी आणि अल्पवयीन मुलाच्या हातात गाडीचं स्टेरिंग देणाऱ्या आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे.
Pune Porsche Accident Case : पुण्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी आणि अल्पवयीन मुलाच्या हातात गाडीचं स्टेरिंग देणाऱ्या आरोपीचा वडील विशाल अग्रवाल याला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील असलेले अग्रवाल गेल्या दोन वर्षांपासून येरवडा केंद्रीय कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे.
22 महिन्यानंतर जामीन मंजूर
गेल्या काही दिवसांपूर्वी विशाल अग्रवाल याने जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता तब्बल पावणे दोन वर्षानंतर म्हणजेच 22 महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. सत्र न्यायालयाला आदेश प्राप्त झाल्यानंतर अटीशर्तींसहीत कारागृहातून सुटका होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात रक्ताचे नुमन्याची फेरबदल करणाऱ्या डॉक्टरला देखील जामीन मंजूर झाला होता. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप ससून रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरे याच्यावर होते.
advertisement
19 मे 2024 रोजी काय घडलं होतं?
दरम्यान, कल्याणीनगरमध्ये 19 मे 2024 रोजी रात्री भरधाव पोर्शे कारने मध्यरात्री एका दुचाकीला उडवलं होतं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की, सीसीटीव्ही पाहिला तरी पोलिसांच्याही अंगावर काटा आला होता. या प्रकरणात आरोपीचा वडील फरार होता. पोलिसांनी संभाजीनगरमधून त्याच्या वडिलाला अटक केली होती. अशातच गेल्या काही दिवसांपासून विशाल जामिनासाठी अर्ज करत होता. अशातच त्याला जामीन मिळाला असता तरी कोर्टाने काही अटी देखील लादल्या आहेत.
advertisement
कोण आहे विशाल आग्रवाल?
विशाल अग्रवाल हा ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचा प्रमुख आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायात गेल्या 40 वर्षापासून ब्रम्हा कॉर्प हे नाव अग्रेसर राहिलंय. ब्रम्हदत्त अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या या उद्योगसमूहांमध्ये अनेक कंपन्या आहेत. वडगाव शेरी, खराडी, विमान नगर या भागात अनेक मोठे गृहप्रकल्प या कंपनीने उभारले आहेत. तसेच ली मेरिडियन हॉटेल, रेसिडेन्सी क्लब यासारखी मोठी बांधकामे देखील ब्रम्हा कॉर्पनेच केली आहेत. ब्रम्हा मल्टीकॉन या कंपन्यांची जबाबदारी ब्रह्मदत्त अग्रवाल यांचा मुलगा सुरेंद्र अग्रवाल आणि त्यानंतर सुरेंद्र अग्रवाल यांचा मुलगा विशाल अग्रवाल याच्याकडे आली होती.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 10, 2026 1:32 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Porsche Accident : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात तब्बल 22 महिन्यानंतर कोर्टाचा मोठा निर्णय








