Budget 2025: बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग होणार? नोकरदारापासून ते सामान्य माणसाला पाहा कसा दिलासा मिळेल

Last Updated:

Union Budget 2025: अर्थसंकल्प सादर होण्यास फक्त पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अशात आगामी बजेटमधून सरकार कोणत्या क्षेत्राबाबत मोठे निर्णय घेऊ शकतात याचा थोडक्यात आढावा...

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. बजेटसाठी फक्त ५ दिवस शिल्लक असताना त्यात कोणत्या घोषणा होतील याबाबत उत्सुकता सर्वांना लागली आहे. बजेटमध्ये डायरेक्ट टॅक्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी निधी वाटपाचे महत्त्वाचे निर्णय होतील.देशातील प्रत्येक व्यक्ती बजेटकडे डोळे लावून बसलेले आहेत. बजेटचा केवळ उत्पादनांच्या किमतींवरच परिणाम होत नाही तर तर सर्विस इंडस्ट्रीच्या किमतींवरही त्याचा परिणाम होतो.
आगामी अर्थसंकल्पातून निर्मला सीतारमण महागाई, रोजगार आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासावर भर दिला गेला होता. यावेळी सरकार रेल्वे, विमान वाहतूक, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी, डेटा सेंटर आणि उत्पादन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करू शकते.
advertisement

पेट्रोल आणि डिझेल

गेल्या वर्षी ऊर्जा पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकारने पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाला 1.19 ट्रिलियन रुपयांचा बजेट दिले होते. मात्र पेट्रोलियम सबसिडीत कपात केली गेली होती. यावेळी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) ने सरकारकडे इंधनावरील उत्पाद शुल्क कमी करण्याची मागणी केली आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात. ज्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्सची किंमत कमी होईल. त्यामुळे उत्पादनांच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
फार्मास्युटिकल क्षेत्रात बदल होण्याची अपेक्षा आहे. बायोकॉनसारख्या कंपन्यांनी सरकारकडे कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील औषधांवर कर माफीची विनंती केली आहे. जर हे लागू झाले तर गंभीर आजारांवरील उपचार स्वस्त आणि सहज उपलब्ध होऊ शकतात.
advertisement

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्सटाईल क्षेत्रासाठी घोषणा

गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी 15,500 कोटी रुपयांचा बजेट देण्यात आला होता. ज्यामध्ये सेमीकंडक्टर्स आणि मोबाईल निर्मितीवर भर होता. यावेळीही सरकार या क्षेत्रात आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी पावले उचलू शकते. ज्यामुळे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती कमी होऊ शकतात. टेक्सटाईल आणि गारमेंट उद्योगाला चालना देण्यासाठी आर्थिक मदत आणि टॅरिफ कपातीची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय कपड्यांना जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकता मिळेल आणि देशांतर्गत किमतीही कमी होतील.
advertisement

मध्यमवर्गीयांना इनकम टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता

मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी सरकार इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करू शकते. 80C अंतर्गत सध्याची मर्यादा 1.5 लाख रुपयांवरून 3 लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. यामुळे करदात्यांना अधिक बचतीची संधी मिळेल.

रेल्वे आणि पायाभूत सुविधा

यावेळी पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे क्षेत्राला विशेष महत्त्व दिले जाऊ शकते. सरकार रस्ते वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेच्या आधुनिकीकरणावर अधिक भर देऊ शकते. यामुळे लॉजिस्टिक्स आणि उत्पादन क्षेत्राला फायदा होईल.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Budget 2025: बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग होणार? नोकरदारापासून ते सामान्य माणसाला पाहा कसा दिलासा मिळेल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement