Budget 2025 Interesting Facts: बजेटच्या बॅगचा रंग लालच का असतो?

Last Updated:

Union Budget Facts in Marathi: यामागे नेमकं काय कारण आहे? लालच रंग का वापरला जातो याबाबत रंजक फॅक्ट जाणून घेणार आहोत.

Budget 2025 Interesting Facts: बजेटच्या बॅगचा रंग लालच का असतो?
Budget 2025 Interesting Facts: बजेटच्या बॅगचा रंग लालच का असतो?
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला नव्या आर्थिक वर्षातलं बजेट मांडणार आहेत. बजेट म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे लाल ब्रिफकेस, या ब्रिफकेसचा रंग लाल का आहे? प्रत्येक बजेटच्यावेळी सीतारमण यांची साडी बदलली, योजना बदलल्या पण ब्रिफकेसचा रंग काही बदलला नाही. यामागे नेमकं काय कारण आहे? लालच रंग का वापरला जातो याबाबत रंजक फॅक्ट जाणून घेणार आहोत.
लालऐवजी दुसऱ्या रंगाचा वापर का होत नाही? बजेट ब्रीफकेस आणि लाल रंगाच्या बॅगचा ब्रिटिशांशी संबंध आहे. 1860 मध्ये, ब्रिटिश चॅन्सलर ग्लॅडस्टोन यांनी सर्वांत पहिल्यांदा राणीचा मोनोग्राम असलेली लाल लेदर ब्रीफकेस अर्थसंकल्प सादर करताना आणली होती. या ब्रीफकेसला 'ग्लॅडस्टोन बॉक्स' म्हणायचे.
लाल रंगाची निवड करण्यामागे दोन कारणं होती, सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या सैन्यात याला विशेष महत्त्व होतं, त्यामुळे बजेट ब्रीफकेस लाल रंगाची होती. 16 व्या शतकाच्या शेवटी राणी एलिझाबेथच्या प्रतिनिधीने स्पॅनिश राजदूताला काळ्या पुडिंगने (स्वीट डिश) भरलेली लाल ब्रीफकेस भेट दिली होती. त्यामुळे लाल रंगाची परंपरा सुरू झाली.
advertisement
दुसरं म्हणजे, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आता टॅबलेटवर बजेट सादर करतात. मात्र जो ज्या कापडात गुंडाळलेला असतो तेही लाल रंगाचंच असतं. 1860 साली ग्लॅडस्टोन आपलं भाषण 6-7 तास करायचे, त्या दरम्यान ते आर्थिक लेखाजोखा मंडत असतं. त्यावेळी कागदपत्र खूप होती, त्यामुळे ती गहाळ होण्याची किंवा बदलण्याची भीती होती.
advertisement
त्यावेळी राणीने त्यांनी ब्रिफकेस दिली आणि त्यातून आपलं भाषण सादर करण्याचा सल्ला दिला. ज्यामुळे भाषणही व्यवस्थित होईल आणि कोणत्याही अडचणी येणार नाहीत. त्यानंतर या बॅगला बजेट बॅग असं नाव पडलं. तिथपासून आजपर्यंत बजेट हे लाल रंगातूनच येतं. भलेही आता कागदांची जागा टॅबने घेतली असेल मात्र ब्रिफकेस किंवा लाल रंगाच्या कापडातून गुंडाळून विधिमंडळात घेऊन जाण्याची परंपरा मात्र वर्षानुवर्ष तशीच आहे.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Budget 2025 Interesting Facts: बजेटच्या बॅगचा रंग लालच का असतो?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement