Insurance Policy होणार स्वस्त? निर्मला सीतारमण मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Last Updated:

पॉलिसीवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना त्याचा थेट फायदा होईल.

बाईक इन्शुरन्स
बाईक इन्शुरन्स
नवी दिल्ली: तुम्ही लाईफ इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट बघणं योग्य ठरेल. कारण, नवीन वर्षापासून तुम्हाला स्वस्त पॉलिसी मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत या बाबत वक्तव्य केल्याने सर्वसामान्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. असं मानलं जात आहे की, पॉलिसीवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास सर्वसामान्यांना त्याचा थेट फायदा होईल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितलं की, पॉलिसी प्रीमियमवरील जीएसटी कमी केल्यास पॉलिसी धारकांना फायदा होईल. याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे. या बाबतचा निर्णय होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल. प्रीमियमवरील जीएसटी दर कमी झाल्यास पॉलिसीच्या किमतींवर परिणाम होईल आणि त्याचा सर्वसामान्यांना फायदा होईल, असं अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं. सध्या विमा पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो.
advertisement
बिहारचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांचा एक गट लाईफ इन्शुरन्स पॉलिसींवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा की नाही, याबाबत विचार विनिमय करत आहे. तसंच पाच लाख रुपयांपर्यंतच्या हेल्थ इन्शुरन्सवरील जीएसटी रद्द करण्याबाबत देखील चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या पॉलिसी होल्डर्सचा जीएसटी माफ करण्याचा विचार केला जात आहे.
advertisement
इन्शुरन्स पॉलिसींवरील जीएसटी रद्द केल्यास किंवा कमी केल्यास सरकारी तिजोरीवर निश्चितच परिणाम होईल. 2023-24 या आर्थिक वर्षात, केंद्र आणि राज्य सरकारांनी पॉलिसी प्रीमियमवर आकारलेल्या जीएसटीमधून 16,398 कोटी रुपये कमवले. यामध्ये दोघांचाही प्रत्येकी 50 टक्के हिस्सा आहे. प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी लावून ही वसुली करण्यात आली आहे.
नितिन गडकरी यांनी मांडला होता मुद्दा
advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इन्शुरन्स पॉलिसींवरील जीएसटी काढून टाकण्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर एका पब्लिक फोरममध्ये ते म्हणाले होते की, इन्शुरन्स पॉलिसीवर 18 टक्के जीएसटी आकारणं योग्य नाही. तो काढून टाकण्याबाबत अर्थमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही ते म्हणाले होते. यानंतर विरोधी पक्षनेत्यांनीही इन्शुरन्स पॉलिसींवरील जीएसटी काढून टाकण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता संसदेत अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे जीएसटीमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आणखी वाढली आहे. इन्शुरन्स पॉलिसी जीएसटीच्या कक्षेतून वगळ्यास देशातील असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Insurance Policy होणार स्वस्त? निर्मला सीतारमण मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement