जेफ्रीज फर्मच्या मते, ‘केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये फार बदल होणार नाही. ती पूर्वीप्रमाणेच असू शकतात. त्यामुळे ऑईल सेक्टरमधील सरकारी कंपन्यांचा नफा उच्च स्तरावर राहील. त्यामुळे ओएनजीसी शेअर्समध्ये अलीकडे झालेली घसरण आता थांबत आहे. गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये या शेअरचा समावेश करण्याची ही चांगली संधी आहे.’ दरम्यान, ओएनजीसीच्या शेअर्सची टार्गेट प्राईज 390 रुपये प्रतिशेअर होईल असा जेफ्रीज फर्मचा अंदाज आहे.
advertisement
नफा वाढेल
जेफ्रीजने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, ओएनजीसी चालू आर्थिक वर्षात त्यांचं उत्पादन वाढवेल. या कंपनीच्या शेअर्ससाठी हा ट्रिगर पॉईंट ठरू शकतो. ओएनजीसीचा नफा मागील सरासरीपेक्षा जास्त राहील, जेफ्रीजचा विश्वास आहे. या पूर्वी फर्मने 15 एप्रिल 2024 ला जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात निव्वळ कर्ज कमी होण्याचा दावा करण्यासोबतच 2024 ते 2026 या आर्थिक वर्षांमध्ये नफ्यात वाढ होईल, असा अंदाज वर्तवला होता.
शेअर मार्केटमध्ये कशी राहिली कामगिरी?
ओएनजीसीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झालीय. गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांना 40 टक्के नफा दिलाय. वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, ओएनजीसीच्या शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 76 टक्के रिटर्न दिलेत.
78 टक्क्यांनी वाढला नफा
आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत ओएनजीसीचा नफा वार्षिक आधारावर 78 टक्क्यांनी वाढून 11 हजार 526 कोटी झालाय. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 6 हजार 478 कोटी होता. कंपनीचं उत्पन्न देखील वार्षिक आधारावर 1.64 टक्क्यांनी वाढलं असून 1.66 लाख कोटी रुपये झालंय. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते 1.64 लाख कोटी होते.