मंगळवारी सेन्सेक्सच्या 30पैकी 21 शेअर्समध्ये खरेदीचा कल होता. निफ्टीच्या 50 मधील 34 शेअर्समध्ये तेजी होती. बँक निफ्टीच्या 12पैकी 10 शेअर्समध्ये खरेदी राहिली. डॉलरच्या तुलनेत रुपया दोन पैशांनी मजबूत होऊन 83.51 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला.
पुढे मार्केटचा कल कसा राहील?
अरिहंत कॅपिटल मार्केट्सच्या अनिता गांधी यांनी सांगितलं, की `सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाबाबत लावल्या जात असलेल्या अनुमानामुळे मार्केटमध्ये अस्थिरता वाढली आहे. याशिवाय एफआयआयने केलेल्या विक्रीमुळे निर्देशांक घसरत आहे. वाढत्या मूल्यामुळेदेखील मार्केटमध्ये नफा पुनर्प्राप्ती सुरू आहे. जेव्हा निफ्टी 50 निर्देशांक 22,000 पेक्षा खाली गेला तेव्हा परत खरेदीकडे कल वाढला आहे.`
advertisement
स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे संतोष मीणा यांनी सांगितलं, की लार्ज कॅप शेअर्समध्ये मूल्य योग्य दिसत आहे. त्यामुळे लार्ज कॅपमध्ये मूल्य खरेदीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यांनी बेंचमार्क निर्देशाकांच्या वाढीचं श्रेय चांगले जागतिक संकेत आणि शॉर्ट पोझिशन कव्हर करणाऱ्या ट्रेडर्सना दिलं आहे. त्यांच्या मते, मिड कॅप आणि स्मॉल कॅप क्षेत्रात मूल्य खूप वाढलं आहे. त्यामुळे काही विभागांमध्ये खराब कामगिरीचा धोका आहे.
संतोष मीणा यांनी गुंतवणूकदारांना लार्ज कॅपवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर एफआयआय लार्ज कॅप शेअर्समध्ये आक्रमकपणे गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अस्थिरता राहू शकते आणि यात वाढ होऊ शकते, अशी अपेक्षा मार्केटच्या जाणकारांनी व्यक्त केली आहे. मीणा म्हणाले, की `निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर इंडिया व्हीआयएक्स पुन्हा 12-13 च्या स्तरापर्यंत घसरेल.`