मात्र प्रश्न असा आहे की, ही घसरण नेमकी पॅनिक सेलिंगमुळेच झाली का? पॅनिक सेलिंग म्हणजे नेमकं काय असतं? ती का होते? ती मोठे ट्रेडर्स करतात की छोटे रिटेल गुंतवणूकदार?आणि पॅनिक सेलिंगनंतर पुढील काही दिवसांत बाजाराची चाल कशी असते?
तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करत असाल आणि या संकल्पना नीट समजून घेणे गरजेचे आहे.
advertisement
पॅनिक सेलिंग म्हणजे काय?
पॅनिक सेलिंग म्हणजे अशी परिस्थिती, जिथे गुंतवणूकदार भीती, अफवा किंवा अति प्रतिक्रिया (Overreaction) यामुळे आपली गुंतवणूक जसे की शेअर्स, एखादा सेक्टर किंवा संपूर्ण इंडेक्स घाईघाईने विकायला सुरुवात करतात.
या विक्रीमुळे शेअर्सच्या किमती झपाट्याने खाली येतात. विशेष म्हणजे अशा वेळी घेतलेले निर्णय हे कंपनीच्या फंडामेंटल्स किंवा तर्कशुद्ध विश्लेषणावर आधारित नसतात, तर पूर्णपणे भावनांवर (Sentiments) अवलंबून असतात. यामुळे बाजारात विक्रीचा पूर येतो, किमती आणखी घसरतात आणि ही प्रक्रिया चेन रिअॅक्शनसारखी पसरत जाते. परिणामी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणावर घट होते आणि बाजार सावरायला कधी कधी आठवडे, महिने किंवा वर्षेही लागू शकतात.
“पॅनिक सेलिंग” हा शब्द कधी आणि कसा प्रचलित झाला?
“पॅनिक सेलिंग” या संज्ञेचा इतिहास 19व्या शतकातील आर्थिक संकटांशी जोडलेला आहे. त्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीमुळे अनेक वेळा बाजार कोसळले.
या शब्दाचा पहिला ठळक वापर 1873 च्या ‘पॅनिक’ दरम्यान दिसून आला. युरोपियन शेअर बाजार कोसळल्यानंतर त्याचा परिणाम अमेरिकन गुंतवणुकीवर झाला आणि भीतीपोटी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर मालमत्ता विकली.
यानंतर:
1893 चा पॅनिक (Silver Purchase Act मुळे)
1929 चा स्टॉक मार्केट क्रॅश (Black Tuesday)
या घटनांमध्येही पॅनिक सेलिंगचा मोठा वाटा होता.
20व्या शतकात Behavioral Finance या शाखेत या संकल्पनेचा सखोल अभ्यास झाला आणि ती गुंतवणूकदारांच्या इरेशनल बिहेवियरचे उदाहरण म्हणून ओळखली जाऊ लागली.
आजची घसरण पॅनिक सेलिंग होती का?
आज निफ्टी-50 मध्ये झालेल्या मोठ्या घसरणीत पॅनिक सेलिंगचा प्रभाव नक्कीच दिसून येतो, मात्र याला पूर्णपणे पॅनिक सेलिंग म्हणणं कदाचित अचूक ठरणार नाही.
ही घसरण ब्रॉड-बेस्ड सेलऑफ होती, जी प्रामुख्याने जागतिक स्तरावरील भीती आणि अनिश्चिततेमुळे झाली.
म्हणजेच, विक्रीचा ट्रिगर जागतिक घडामोडी होत्या, पण त्यावर बाजाराने दिलेली प्रतिक्रिया पॅनिक सेलिंगसारखी होती.
आजच्या घसरणीतून अंदाजे 10–12 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन नष्ट झाल्याचे मानले जात आहे.
आजच्या घसरणीमागची प्रमुख कारणे:
1) ग्लोबल ट्रेड टेन्शन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर दावा आणि युरोपियन युनियनवर नव्या टॅरिफ्सची धमकी दिल्यामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला.
2) FII ची मोठी विक्री
जानेवारी महिन्यात Foreign Institutional Investors (FIIs) यांनी सुमारे 3 अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत. ऑगस्ट 2025 नंतरची ही सर्वात मोठी विक्री आहे. या विक्रीमुळे बाजारावर अतिरिक्त दबाव आला.
3) कमकुवत निकाल आणि सेक्टरल घसरण
Nifty IT Index 2% घसरला
रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या शेअर्समध्ये विक्री
सर्वच सेक्टर्स लाल निशाणावर
रिअल्टी इंडेक्स तब्बल 5% घसरला
4) रुपया कमकुवत आणि जिओपॉलिटिकल रिस्क
रुपयाच्या घसरणीसोबतच जागतिक राजकीय तणावामुळे निगेटिव्ह सेंटिमेंट वाढला. India VIX (Volatility Index) दोन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, जो बाजारातील भीती दर्शवतो.
पॅनिक सेलिंग कोण करतो? छोटे की मोठे ट्रेडर्स?
पॅनिक सेलिंग प्रामुख्याने छोटे रिटेल गुंतवणूकदार करतात. कारण:
ते अधिक भावनिक असतात
त्यांची जोखीम सहन करण्याची क्षमता कमी असते
निगेटिव्ह बातम्यांवर ते पटकन प्रतिक्रिया देतात
मोठे ट्रेडर्स किंवा संस्थात्मक गुंतवणूकदार (Mutual Funds, FIIs) साधारणपणे डेटा आणि दीर्घकालीन रणनीतीवर आधारित निर्णय घेतात, त्यामुळे ते थेट पॅनिक सेलिंग करत नाहीत.
मात्र मोठ्या संस्थांची विक्री (जसे की FII Outflows) पॅनिकची सुरुवात करू शकते आणि त्यामागे छोटे गुंतवणूकदार धाव घेतात.
पॅनिक सेलिंग का होते?
भीती आणि भावना – तोटा होईल या भीतीने गुंतवणूकदार घाईघाईने विक्री करतात
निगेटिव्ह बातम्या किंवा अफवा – युद्ध, मंदी, ट्रेड वॉर यासारख्या घटना
हर्ड मेंटॅलिटी – इतरांना विकताना पाहून स्वतःही विक्री करणे
ओव्हरव्हॅल्यूएशन – किंमती जास्त असतील तर छोटासा ट्रिगरही मोठी घसरण घडवतो
पुढे बाजाराची चाल कशी असू शकते?
पॅनिक सेलिंगनंतर बाजार सहसा अस्थिर (Volatile) राहतो, पण इतिहास पाहता तो हळूहळू सावरतो.
शॉर्ट टर्म: अजून घसरण किंवा साइडवेज मूव्हमेंट VIX उच्च पातळीवर राहतो
मीडियम टर्म: बाजार बॉटम तयार केल्यानंतर रिबाउंड, व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स खरेदी सुरू करतात. उदा: 2008 आर्थिक संकट किंवा 2020 कोविड क्रॅश नंतरची जोरदार रिकव्हरी
सामान्य पॅटर्न: 2–5 दिवसांत स्थिरता येऊ शकते; पण जर कारण खोल असेल (मंदी, जागतिक संकट), तर रिकव्हरीसाठी महिने किंवा वर्षेही लागू शकतात
