राघव चड्ढा हा आम आदमी पक्षाचा तरुण चेहरा आहे तर परिणीती चोप्रा ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. 13 मे 2023 रोजी दोघांनी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये एंगेजमेंट केली. ज्यामध्ये त्यांचे कुटुंबीय आणि राजकीय जगताशी निगडित काही लोक सहभागी झाले होते. सध्या दोन्ही कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
advertisement
राघव चढ्ढा हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत
राघव चढ्ढा हे आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार आहेत. 2012 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टी (AAP) मध्ये सामील होऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यासोबतच ते चार्टर्ड अकाउंटंट (CA) देखील आहेत. . ग्रँट थॉर्नटन, डेलॉइट, श्याम मालपाणी यांच्यासह अनेक बड्या अकाउंटन्सी कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 50 लाख रुपये आहे. राघवच्या खाजगी घराबद्दल बोलायचे झाले तर त्याच्या घराची किंमत 37 लाख रुपये आहे.
परिणीती करोडोंची मालकीण आहे
परिणीती चोप्रा संपत्तीच्या बाबतीत राघव चढ्ढापेक्षा खूप पुढे आहे. राघव आणि परिणीती यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेय. तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे चित्रपट फी आणि ब्रँड एंडोर्समेंट. सियासेटच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राची एकूण संपत्ती 60 कोटी रुपये आहे. अभिनेत्रीकडे मुंबईमध्ये लक्जरी सी फेसिंग अपार्टमेंट आणि ऑडी A6, Jaguar XJL, Audi Q5 आणि Jaguar XJL सारख्या अनेक लक्झरी कार आहेत.
अशी झाली दोघांची भेट
सुमारे 15 वर्षांपूर्वी, परिणीती चोप्रा यूकेमधील यूनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमध्ये बिझनेस, इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचा डिग्री कोर्स करत होती. असे म्हटले जाते की, राघव चढ्ढा देखील त्याच वेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते आणि त्यांची सुरुवातीची ओळख त्याच काळात यूकेमध्ये झाली आणि तेव्हापासून दोघेही एकमेकांना ओळखू लागले. त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचे तर राघव आणि परिणीतीची लव्हस्टोरी फार जुनी नाही. गेल्या वर्षी परिणीतीच्या एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली तेव्हापासून ही प्रेमकथा सुरू झाल्याचे मानले जाते. परिणीती पंजाबमध्ये 'चमकिला' चित्रपटाचे शूटिंग करत होती.