क्रेडिट यूटिलायझेशन रेश्यो (CUR)
तुम्ही कार्ड बंद करता, तेव्हा तुमची एकूण उपलब्ध क्रेडिट लिमिट कमी होते. यामुळे तुमचा क्रेडिट वापर प्रमाण (CUR) वाढू शकतो, जो तुमच्या एकूण क्रेडिट मर्यादेशी तुमच्या क्रेडिट वापराचे गुणोत्तर आहे. हे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा जास्त असेल, तर तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो कारण ते कर्जावर जास्त अवलंबून असल्याचे दर्शवते. समजा तुमच्याकडे दोन क्रेडिट कार्ड आहेत. दोन्हीची लिमिट ₹1,00,000 आहे. तुम्ही ₹20,000 खर्च केले तर तुमचा यूटिलायझेशन रेश्योर 10% आहे - जो चांगला मानला जातो. पण जर तुम्ही एक कार्ड बंद केले तर तुमची एकूण लिमिट ₹1,00,000 असेल आणि त्याच ₹20,000 खर्चाचा वापर आता 20% वापर गुणोत्तर दर्शवेल. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो.
advertisement
जुन्या क्रेडिट हिस्ट्रीचे महत्त्व
- तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची लांबी तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये अंदाजे 15% योगदान देते.
- तुम्ही जुने कार्ड बंद केल्यास, तुमच्या अकाउंटचे सरासरी वय कमी होते.
- कर्ज किंवा बिल वेळेवर परतफेड करण्याची दीर्घकालीन सवय तुमची प्रोफाइल मजबूत करते.
क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलाय? या 4 मोठ्या चुका टाळा
क्रेडिट मिक्स देखील महत्त्वाचे
- तुमचा स्कोअर केवळ कार्डांवर अवलंबून नाही—क्रेडिट कार्ड, होम लोन आणि पर्सनल लोन यासारख्या विविध कर्जांचे संतुलित मिश्रण देखील महत्त्वाचे आहे.
- कार्ड बंद केल्याने ही विविधता कमी होऊ शकते.
- पुढील नुकसान टाळण्यासाठी कार्ड बंद करण्यापूर्वी सर्व थकबाकी भरणे महत्वाचे आहे.
कार्ड बंद करण्याचा विचार कधी करावा
कधीकधी, कार्ड बंद करणे आवश्यक असू शकते - जसे की कार्डवर उच्च व्याजदर असेल, हिडन चार्ज असेल किंवा फसवणुकीचा धोका असेल.
पण हे पाऊल काळजीपूर्वक उचलले पाहिजे. कार्ड ठेवणे किंवा बंद करणे तुमच्यासाठी चांगले आहे की नाही हे ठरवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.