EDLI योजना 1976 मध्ये सुरू झाली. ज्याचा उद्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना विम्याचा लाभ मिळवून देणे हा आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा EPFO सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा कुटुंबाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. विम्याची रक्कम ईपीएफ खातेधारकाच्या नॉमिनीला दिली जाते. जर कोणाला नॉमिनी केले गेले नसेल, तर त्याच्या कायदेशीर वारसांना विम्याची रक्कम तितकीच मिळते. कर्मचाऱ्याचा आजार, अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास विमा संरक्षण दिले जाऊ शकते.
advertisement
अचानक आर्थिक अडचण आलीये, SIP पॉज करावी की बंद? हे ऑप्शन आहे बेस्ट
विम्याची रक्कम पगारावर अवलंबून असते
EDLI योजनेंतर्गत मिळणारी विमा रक्कम मागील 12 महिन्यांच्या पगारावर अवलंबून असते. एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्तीला 20 टक्के बोनससह मागील 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 30 पट मिळते. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा जमा होणाऱ्या पीएफच्या रकमेपैकी 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये, 3.67 टक्के ईपीएफमध्ये आणि 0.5 टक्के रक्कम ईडीएलआय योजनेत जमा केली जाते.
तुम्ही तुमची नोकरी सोडल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाहीत
EDLI योजनेअंतर्गत कोणताही खातेदार किमान 2.5 लाख रुपये आणि कमाल 7 लाखांचा इन्शुरन्स क्लेम मिळवू शकतो. किमान क्लेम मिळविण्यासाठी, खातेदाराने सतत किमान 12 महिने नोकरी केली असावी. नोकरी सोडणाऱ्या खातेदाराला विम्याचा लाभ दिला जात नाही.
पीएफ खात्यावरील या विम्याचा दावा तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा पीएफ खातेधारकाचा सेवेत असताना मृत्यू होतो, म्हणजे निवृत्तीपूर्वी. या काळात तो कार्यालयात काम करत असो वा रजेवर असो. काही फरक पडत नाही.