जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढून 68 डॉलर प्रति बॅरलच्या दिशेने जात आहेत. याचा परिणाम सोमवारच्या सकाळी देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर दिसून आला. सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, आज अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, तर काही शहरांमध्ये किमतीत घटही झाली आहे.
advertisement
कुठे वाढलं आणि कुठे महाग झालं इंधन
सरकारी तेल कंपन्यांनुसार, उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पेट्रोल 27 पैशांनी स्वस्त होऊन 94.87 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. डिझेलही 25 पैशांनी घसरून 87.82 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर गाझियाबादमध्ये पेट्रोल 21 पैशांनी वाढून 94.76 रुपये प्रति लीटर तर डिझेल 23 पैशांनी वाढून 87.52 रुपये प्रति लीटर झाले आहे. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 17 पैशांनी वाढून 94.57 रुपये प्रति लीटर तर डिझेल 19 पैशांनी वाढून 87.76 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे.
कच्च्या तेलाचे दर
मागच्या 24 तासात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ वाढ झाली. त्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव 67.40 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे, तर डब्लूटीआय (WTI) चा दरही वाढून 63.92 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. हे सगळं असलं तरी देशातील चारही प्रमुख महानगरांमध्ये इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही, त्यामुळे या चार मोठ्या महानगरांमधील लोकांना दिलासा मिळाला आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली: पेट्रोल 94.72 रुपये आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लीटर.
मुंबई: पेट्रोल 103.44 रुपये आणि डिझेल 89.97 रुपये प्रति लीटर.
चेन्नई: पेट्रोल 100.76 रुपये आणि डिझेल 92.35 रुपये प्रति लीटर.
कोलकाता: पेट्रोल 104.95 रुपये आणि डिझेल 91.76 रुपये प्रति लीटर.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये बदल होतो आणि नवीन दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची मूळ किंमत जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलचे दर इतके महाग होत आहेत.