प्रधानमंत्री फसल बिमा योजना काय आहे?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम फसल बिमा योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पिकावर विमा संरक्षण दिलं जातं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याच्या हप्त्याच्या 50 टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित 50 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदान म्हणून देतात. या योजनेत रब्बी पिकांवर विमा संरक्षणाचा प्रीमियम 1.5 टक्के आहे. यातला शेतकऱ्याला फक्त 0.75 टक्के विमा प्रीमियम भरावा लागतो. उर्वरित रक्कम सरकार सबसिडी म्हणून देते. पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या विम्यामुळे आर्थिक मदत मिळते.
advertisement
आवश्यक कागदपत्रं
- अॅप्लीकेशन लेटर
- पेरणी प्रमाणपत्र
- शेतीच्या जमिनीचा नकाशा
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
पैशांची बचत होत नाही? खर्चाला आवर घालण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
अर्ज कसा करायचा?
- तुम्हाला तुमच्या जिल्हा बँकेत किंवा कृषी कार्यालयात जावं लागेल.
- तिथे तुम्हाला प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचा अर्ज भरावा लागेल.
- फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं पीक, शेत, विम्याची रक्कम इत्यादी माहिती द्यावी लागेल.
- यानंतर शेतकऱ्यांना फॉर्मसह सर्व कागदपत्रांच्या फोटो कॉपीज जमा कराव्या लागतील.
- जेव्हा कृषी कार्यालय किंवा बँकेकडून अर्ज स्वीकारला जाईल, तेव्हा शेतकऱ्याला विम्याचा प्रीमियम भरावा लागेल.
- विम्याचा हप्ता भरल्यानंतर शेतकऱ्याला पीक विमा पॉलिसी मिळेल.