अशीच एक योजना, पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही जोखीममुक्त आहे, म्हणजेच तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनांवरील व्याजदर तिमाही निश्चित केला जातो आणि वेळोवेळी बदलू शकतो.
PPF: दीर्घकालीन चमत्कार
पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ही 15 वर्षांच्या मुदतपूर्ती कालावधीसह दीर्घकालीन योजना आहे. सरकार या योजनेवर अंदाजे 7.1% व्याजदर देते, जो दरवर्षी टॅक्स फ्री असतो. तुम्ही पीपीएफमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त ₹1.5 लाख गुंतवणूक करू शकता आणि ही गुंतवणूक कलम 80C अंतर्गत आयकर सूटसाठी पात्र आहे.
advertisement
फक्त FD केल्याने होणार नाही श्रीमंत! फायनेंशियल एक्सपर्टने सांगितलं मालामाल होण्याचं रहस्य
तुम्ही दरमहा ₹12,500 किंवा दररोज अंदाजे ₹416 गुंतवू शकता. तुम्ही ही गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवली तर निवृत्तीनंतर तुम्हाला मोठी रक्कम मिळेल.
PPFमध्ये गुंतवणूक करून तुम्ही करोडो कसे कमवू शकता?
तुम्ही सलग 15 वर्षे पीपीएफमध्ये दरवर्षी ₹1.5 लाख गुंतवले तर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर अंदाजे 41.35 लाख रुपये लाख मिळतील. तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये असेल आणि उर्वरित रक्कम व्याज म्हणून मिळेल. जर गुंतवणूक कालावधी 20 वर्षांपर्यंत वाढवला तर एकूण रक्कम अंदाजे ₹67.69 लाखांपर्यंत पोहोचते, ज्यामध्ये एकूण गुंतवणूक ₹30 लाख आणि व्याज ₹37.69 लाख असेल.
लहान मुलांचं आधार कार्ड कधी अपडेट करणं गरजेचं? समजून घ्या स्पेट बाय स्टेप प्रोसेस
आणि जर तुम्ही 25 वर्षे सातत्याने गुंतवणूक केली तर तुमचा निधी ₹1.03 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. एकूण गुंतवणूक ₹37.5 लाख आणि व्याज ₹65.5 लाख असेल. ही योजना दीर्घकालीन काळात लहान गुंतवणुकींमध्येही वाढ करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
लहान बचतींमधून मोठे फायदे
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. लहान बचती करूनही तुम्ही या योजनेतून लक्षणीय फायदे मिळवू शकता. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे जे जोखीम घेण्यास टाळाटाळ करतात आणि स्थिर, विश्वासार्ह उत्पन्न हवे आहे.