यावर तुम्हाला जबरदस्त व्याज मिळेल. कुमार मेहता यांनी सांगितले की, ग्राहकांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो आणि नगदी पैसे किंवा चेकबुक घेऊन आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल. यानंतर तुमच्या खात्या जमा रक्कम टाइम डिपॉझिटअंतर्गत जमा करुन तगडे व्याज कमावले जाऊ शकते. पोस्टमास्तर म्हणाले की, जर कोणत्याही व्यक्तीला टाइम डिपॉझिट खात्यात पैसे जमा करायचे असतील तर तो किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकतो.
advertisement
जर तुम्ही एका वर्षासाठी पैसे जमा केले तर तुम्हाला 6.6 टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांच्या ठेवीवर 6.8 टक्के तर तीन वर्षांच्या ठेवीवर 6.9 टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय तुम्ही पाच वर्षांसाठी रक्कम जमा केल्यास त्यावर 7 टक्के व्याज मिळेल. टाइम डिपॉझिटमध्ये पैसे जमा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.
टाइम डिपॉझिटअंतर्गत सहा महिनेयपर्यंत लॉक इन पीरिडय राहतो. म्हणजे पुढचे सहा महिनेयपर्यंत पैसे तुम्ही काढू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला पैसे काढायचे असतील तर त्यांना मॅच्योरिटी टाइमपूर्वी पैसे काढल्यास सेविंग खात्यावर मिळणारे व्याजदरच मिळेल. मात्र जर कुणी त्यांच्या ठरलेल्या मॅच्योरिटी टाइमवर पैसे काढले तर त्यांना टाइम डिपॉझिटअंतर्गत निर्धारित व्याजाचा लाभ मिळेल.