कुणाला करावं लागणार KYC
हा नियम केवळ जनधन खात्यासाठीच नाही तर इतरही बँक खात्यात तुमचं अकाउंट असेल तर केवायसी अपडेट आहे की नाही ते तपासून घ्या. केवायसी अपडेट नसेल तर तुमचं खातं निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळोवेळी खातं अपडेट करत राहा. ज्यांनी जन धन खाते उघडलं आहे अशा सर्व खातेधारकांना री-केवायसी करणं आवश्यक आहे, कारण या खात्यांची वैधता 10 वर्षांची असते. सरकारने हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर निश्चित केली आहे.
advertisement
ही शेवटची तारीख
जर तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे जन धन खाते बंद होऊ शकते. खाते निष्क्रिय झाल्यास तुमच्या खात्यातील सर्व व्यवहार थांबतील आणि तुम्हाला सरकारी अनुदाने मिळण्यातही अडचण येऊ शकते. री-केवायसी ही एक सोपी प्रक्रिया आहे. या अंतर्गत तुम्ही तुमची जुनी माहिती जसे की नाव, पत्ता आणि फोटो बँकेत जाऊन अद्ययावत करू शकता. ही प्रक्रिया फसवणूक रोखण्यासाठी आणि बँकिंग सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
कुठे आणि कसे कराल:
ज्या बँकेत तुमचे जन धन खाते आहे, त्या बँक शाखेत जा.
तुमची ओळखपत्रे पत्त्याचा पुरावा आणि फोटो सोबत घ्या.
तुम्ही कोणतीही फी न भरता ही री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
दसऱ्याला 150000 रुपयांवर जाणार चांदी, सोन्याच्या दरांची काय स्थिती; कमी झाले की स्वस्त?
जन धन खात्याचे फायदे
जन धन खाते हे अनेक महत्त्वाच्या सुविधांसह येते
झिरो बॅलन्स- या खात्यात किमान रक्कम ठेवणे बंधनकारक नसते.
मोफत रुपे कार्ड- तुम्हाला मोफत रुपे कार्ड मिळते, ज्यातून तुम्ही ATM मधून पैसे काढू शकता किंवा दुकानांमध्ये पेमेंट करू शकता.
2 लाख रुपयांचा अपघात विमा- खातेधारकाला दिलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते.
ओव्हरड्राफ्ट सुविधा- जन धन खात्यावर तुम्ही 10,000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता.
जन धन खाते बंद होण्याचा धोका टाळण्यासाठी, खातेधारकांनी तात्काळ आपापल्या बँकेत जाऊन री-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.