भारतीय रेल्वेनं आतापर्यंत वेटिंग तिकीट घेतल्यावर चार्ट तयार होईपर्यंत वाट बघावी लागायची. कधी तिकीट कन्फर्म होतं, कधी RAC मिळतं, तर कधी शेवटच्या क्षणी प्रवास रद्द करावा लागतो. पण आता ही अनिश्चितता दूर होणार आहे. कारण IRCTC अॅप आणि वेबसाइटवर तिकीट बुक करतानाच कन्फर्म तिकीट होण्याची शक्यता म्हणजेच Confirmation Probability दाखवली जाईल.
advertisement
FASTag Annual Pass Rules: 3000 रुपयांत फक्त 200 ट्रिप फ्री, त्या संपल्यावर पुढे काय?
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, सामान्य दिवसांमध्ये सुमारे 26 टक्के वेटिंग तिकिटं शेवटी कन्फर्म होतात. पण सणासुदीच्या काळात ही शक्यता घटते. यामागचं कारण म्हणजे 60 दिवस आधी बुक केलेल्या तिकिटांचं रद्द होण्याचं प्रमाण फारच कमी असतं. तरीही सुमारे 21 टक्के प्रवासी कन्फर्म तिकीट घेतल्यानंतर प्रवास रद्द करतात. चार्ट तयार झाल्यानंतरही काही प्रवासी ट्रेन पकडत नाहीत. ही रद्द झालेली किंवा रिकामी राहिलेली तिकिटं मग वेटिंग यादीतील प्रवाशांना दिली जातात.
प्रत्येक स्लीपर किंवा थर्ड एसी कोचमध्ये सरासरी 72 सीट्स असतात. यामध्ये 17 ते 18 वेटिंग नंबरपर्यंतची तिकिटं सहज कन्फर्म होण्याची शक्यता असते. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये 8 ते 10 स्लीपर कोच असतात. त्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये किमान 75–80 वेटिंग तिकीटं कन्फर्म होऊ शकतात. मात्र तिथे तुम्हाला किती टक्के कन्फर्म होईल त्याची पॉसिबलिटी दाखवत आहे. साधारण 40 टक्क्यांहून खाली तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी मानली जाते.
FASTag Annual Toll Pass : 3000 FASTag पास घेतला? या महामार्गांवर चालणारच नाही, तुमचं शहर आहे का यादीत?
IRCTC अॅपवर किंवा वेबसाइटवरून तिकीट बुक करताना आता High, Medium, Low अशा टॅग्जद्वारे ही शक्यता दाखवली जाईल. म्हणजे बुक करतानाच समजेल की तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाच्या तयारीची गडबड वाचेल आणि निर्णयही वेळेवर घेता येईल. रेल्वे आता चार्ट 4 तासांऐवजी 24 तास आधी तयार करण्याचा विचार करत आहे. यामुळे आणखी लवकर स्पष्टता मिळेल आणि प्रवाशांसाठी पुढचा प्लॅन तयार करणं अधिक सोपं होईल.