FASTag Annual Toll Pass : 3000 FASTag पास घेतला? या महामार्गांवर चालणारच नाही, तुमचं शहर आहे का यादीत?

Last Updated:

FASTag Annual Toll Pass: तुम्ही पास काढायला जाल आणि नंतर लक्षात येईल की अरेच्चा हा पास इथे तर चालतच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पास राज्याच्या अंतर्गत असलेल्या महामार्गांवर आणि एक्सप्रेस वेवर चालणार नाही.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
FASTag Annual Toll Pass: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकतीच महत्त्वाची घोषणा केली. 3000 रुपयांचा FASTag पास काढून वर्षभर टोलफ्री प्रवास करता येणार. मात्र त्यासाठी केवळ 200 पासची अट आहे. त्यानंतर मात्र पुन्हा पास काढावा लागणार आहे. एक वर्षात तुम्ही कितीही पास काढू शकता. त्याबाबत तूर्तास तरी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आली आहे. या पासची सवलत NHAI च्या अखत्यारीतील राष्ट्रीय महामार्गांवर आणि एक्सप्रेस वेवर लागू होणार आहे. मात्र, अनेक मोठे आणि महत्त्वाचे एक्सप्रेसवे आणि महामार्ग या योजनेच्या बाहेर आहेत, हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
तुम्ही पास काढायला जाल आणि नंतर लक्षात येईल की अरेच्चा हा पास इथे तर चालतच नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पास राज्याच्या अंतर्गत असलेल्या महामार्गांवर आणि एक्सप्रेस वेवर चालणार नाही. केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर चालणार आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 87 टोलनाके आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आणि ड्रिम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग यावर हा पास चालणार नाही.
advertisement
इतकंच नाही तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरही सर्वाधिक प्रवास केला जातो. मात्र इथेही हा पास चालणार नाही. याशिवाय अटल सेतूवरही हा पास चालणार नाही. महाराष्ट्रात अनेक लोक मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग किंवा मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे यासारख्या मार्गांवर दररोज प्रवास करतात. पण हे मार्ग Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) किंवा BOT (Build-Operate-Transfer) तत्वावर खासगी कंपन्यांमार्फत चालवले जात असल्याने FASTag चा हा नवीन 3000 रुपयांचा पास या मार्गांवर चालणारच नाही. म्हणजे जर तुम्ही दररोज या मार्गांवरून प्रवास करत असाल, तर तुम्हाला या योजनेचा काडीचाही फायदा मिळणार नाही.
advertisement
हीच स्थिती इतर अनेक राज्यांतही आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवे, पूर्वांचल, बुंदेलखंड, आणि आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवे हे UPEIDA या राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहेत. कर्नाटकात बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे, गुजरातमध्ये अहमदाबाद-वडोदरा महामार्ग, तमिळनाडूत ईस्ट कोस्ट रोड आणि चेन्नई-बेंगळुरू महामार्गही राज्य यंत्रणांद्वारे चालवले जातात. त्यामुळे या मार्गांवरही FASTag चा २०० ट्रिप्सपास लागू होणार नाही.
advertisement
महाराष्ट्रातील टोलची संपूर्ण यादी
हे लक्षात घेतलं पाहिजे की, सरकारची ही योजना NHAI द्वारे चालवल्या जाणाऱ्या निवडक मार्गांपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे नागरिकांनी FASTag चा 3000 रुपयांचा पास घेण्याआधी तो त्यांच्या प्रवास मार्गांवर लागू होतो की नाही, हे एकदा तपासून पाहणं अत्यावश्यक आहे. अन्यथा न वापरण्यायोग्य पासासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात हा पास चालणारच नाही का? तर असं नाही 18 जवळपास नॅशनल हायवे आहेत जिथे हा पास चालू शकतो मात्र त्यावरुन प्रवास फार कमी केला जातो.
मराठी बातम्या/मनी/
FASTag Annual Toll Pass : 3000 FASTag पास घेतला? या महामार्गांवर चालणारच नाही, तुमचं शहर आहे का यादीत?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement