TRENDING:

ट्रेनच्या वेटिंग तिकीटांचा फंडा काय? पहिले GNWL तिकीट कंफर्म होतं की PQWL?

Last Updated:

वेटिंग लिस्टबद्दल सर्व प्रवाशांना माहीत असते, मात्र वेटिंग लिस्ट कोणत्या व किती प्रकारच्या असतात आणि कोणत्या वेटिंग लिस्टमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची अधिक शक्यता असते हे फार कमी लोकांना माहिती असते.

advertisement
नवी दिल्ली : रेल्वे हे भारतातील दळण-वळणाचे सर्वांत स्वस्त साधन आहे. ट्रेनमध्ये सीट मिळवण्यासाठी नेहमीच भांडणं होताना दिसतात. दिवाळीसारख्या सणांवेळी तर ट्रेनमध्ये कन्फर्म तिकिट मिळणं अशक्य असतं. अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकीट न मिळाल्याने त्यांची नावं वेटिंग लिस्टमध्ये जातात. ट्रेनमधील सर्व सीट्स बुक केल्यावर रेल्वे वेटिंग तिकीट जारी करते. जर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशाने तिकीट रद्द केलं तर त्याचं सीट वेटिंग लिस्टमधील दुसऱ्या प्रवाशाला दिलं जातं. वेटिंग तिकिटांच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत व त्या कन्फर्म होण्याच्या शक्यताही वेगवेगळ्या असतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

वेटिंग लिस्टबद्दल सर्व प्रवाशांना माहीत असते, मात्र वेटिंग लिस्ट कोणत्या व किती प्रकारच्या असतात आणि कोणत्या वेटिंग लिस्टमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची अधिक शक्यता असते हे फार कमी लोकांना माहिती असते. रेल्वे वेटिंग लिस्टमध्ये जनरल वेटिंग लिस्ट (GNWL), रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL), पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट (PQWL) आणि तत्काल कोटा वेटिंग लिस्ट (TQWL) अशा अनेक श्रेणी असतात. यापैकी कोणत्या श्रेणीतील वेटिंग तिकिटांची कन्फर्म होण्याची शक्यता जास्त असते ते जाणून घ्या.

advertisement

जनरल वेटिंग लिस्ट (GNWL)

जेव्हा मुख्य स्टेशनवरून, जिथून प्रवास सुरू होतोय तिथून तिकिट काढल्यास GNWL वेटिंग लिस्ट जारी केली जाते. समजा, जर तुम्ही दिल्ली ते मुंबई प्रवास करताना दिल्लीतून ट्रेनचं तिकिट काढलं तर तुमचं तिकीट GNWL वेटिंग लिस्टमध्ये असतं. तुम्ही त्याच ट्रेनमधील कोणत्याही इतर मधल्या स्टेशनवरून तिकीट घेतल्यास, तुम्हाला जनरल वेटिंग मिळणार नाही. जनरल वेटिंग लिस्टमधील तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

advertisement

रिमोट लोकेशन वेटिंग लिस्ट (RLWL)

RLWL वेटिंग लिस्ट त्या स्टेशनवरून जारी केलेल्या असतात, जे महत्त्वाचे स्टेशन असतात. म्हणजे जर हावडा ते दिल्लीच्या ट्रेनमध्ये कोणी पाटण्याहून तिकीट घेतले असेल तर त्याला RLWL वेटिंग तिकीट मिळेल. हे तिकिट कन्फर्म होण्याची शक्यता GNWL पेक्षा कमी असते.

पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट (PQWL)

जे ट्रेनच्या सुरुवातीच्या व शेवटच्या स्टेशनच्या दरम्यानच्या स्टेशनवरून प्रवास करतात, त्यांच्यासाठी PQWL असते. लहान स्टेशनवरून वेटिंग तिकीट घेतल्यास त्यावर PQWL लिहिलेलं असतं. या तिकिटांना वेटिंग लिस्टमधून कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते.

advertisement

तत्काल कोटा वेटिंग लिस्ट (TQWL)

तत्काल तिकीट बूक केल्यावर कन्फर्म सीट मिळत नाही, तेव्हा TQWL तिकीट असतं. हे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यताही सगळ्यात कमी असते, कारण यासाठी कोणताही वेगळा कोटा नसतो.

मराठी बातम्या/मनी/
ट्रेनच्या वेटिंग तिकीटांचा फंडा काय? पहिले GNWL तिकीट कंफर्म होतं की PQWL?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल