TRENDING:

Ration Card E-KYC: रेशन कार्डधारकांनो, 7 दिवसांत हे काम कराच! नाहीतर मिळणार नाही धान्य

Last Updated:

How to do Ration Card E-KYC:भारतातील कोट्यवधी कुटुंबांना स्वस्त तर काही धान्य मोफत देणाऱ्या राशनकार्ड योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

advertisement
मुंबई: कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे केवळ 7 दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला सरकारकडून दिलं जाणारं मोफत धान्य मिळणार नाही. त्यामुळे आताच हे काम करून घ्या. तुमच्या घरातील सदस्यांपैकी एकाही व्यक्तीनं हे काम चुकवलं तरी कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. त्यापैक्षा झटपट हे काम करू घेणं चांगलं.
News18
News18
advertisement

भारतातील कोट्यवधी कुटुंबांना स्वस्त तर काही धान्य मोफत देणाऱ्या राशनकार्ड योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. जर तुमच्या कुटुंबानं अजूनपर्यंत राशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ३० जून २०२५ ही अंतिम मुदत सरकारनं जाहीर केली आहे. त्या आधी ई-केवायसी न केल्यास, १ जुलैपासून तुमचं नाव राशन योजनेच्या यादीतून वगळलं जाऊ शकतं, आणि स्वस्त किंवा मोफत धान्य मिळणं थांबेल.

advertisement

केंद्र सरकारनं राशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केली आहे. अनेक राज्यांत अद्याप कोट्यवधी लोकांचं आधार कार्ड रेशनला लिंक झालेली नाही, त्यामुळे फक्त पात्र कुटुंबांनाच राशन मिळावं या हेतूनं ही कारवाई होत आहे. ई-केवायसीद्वारे प्रत्येक सदस्याच्या नाव, जन्मतारीख आणि आधार नंबरची पडताळणी केली जाते.

जर तुम्ही ३० जूनपूर्वी ई-केवायसी केली नाही, तर १ जुलै २०२५ पासून तुमचं नाव राशन कार्डमधून हटवले जाऊ शकते. सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) तर्फे मिळणारं स्वस्त/मोफत धान्य बंद होऊ शकतं. तुम्हाला रेशन कार्डसाठी पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागेल.

advertisement

FASTag Annual Pass Rules: 3000 रुपयांत फक्त 200 ट्रिप फ्री, त्या संपल्यावर पुढे काय?

ई-केवायसी कसं करायचं?

तुमचं राज्य कोणतं आहे त्यानुसार, ई-केवायसीसाठी प्रत्येकाची स्वतंत्र वेबसाईट आहे.

तुमच्या राज्याच्या PDS विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा

राशन कार्ड ई-केवायसी किंवा Aadhaar Seeding यावर क्लिक करा

तुमचा राशन कार्ड नंबर आणि संबंधित आधार क्रमांक टाका

advertisement

आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका

पडताळणी पूर्ण झाल्यावर KYC Complete असा मेसेज दिसेल

IRCTC Confirm Ticket : वेटिंग तिकीट घेताय? आता बुक करतानाच कळणार ते कन्फर्म होणार की नाही!

ज्यांच्याकडे इंटरनेट नाही किंवा स्मार्टफोन वापरता येत नाही, त्यांनी जवळच्या रेशन दुकानात किंवा फूड सप्लाय कार्यालयात जाऊन, EPOS मशीनद्वारे आधार लिंक करून घ्यावी. बिहार, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये ही सुविधा विनामूल्य आहे.जर तुमचं नाव आधीच हटवलं गेलं असेल आणि केवायसी पूर्ण होती, तर योग्य कागदपत्रांसह (जसं की आधार, मोबाईल क्रमांक) जवळच्या रेशन दुकानात किंवा कार्यालयात संपर्क करा पुन्हा नोंदणी करून घ्या .

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Ration Card E-KYC: रेशन कार्डधारकांनो, 7 दिवसांत हे काम कराच! नाहीतर मिळणार नाही धान्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल