IRCTC Confirm Ticket : वेटिंग तिकीट घेताय? आता बुक करतानाच कळणार ते कन्फर्म होणार की नाही!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
IRCTC Confirm Ticket : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी चार्ट 24 तास आधी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. IRCTC अॅपवर तिकीट बुक करताना कन्फर्म होण्याची शक्यता दाखवली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना तयारीसाठी अधिक वेळ मिळेल.
IRCTC Confirm Ticket : तिकीट काढलं आणि ते चुकून वेटिंगवर असेल तर मनात धाकधूक वाढते. तिकीट कन्फर्म होणार की नाही याची धाकधूक राहाते. शेवटच्या 24 तासात तिकीट कन्फर्म नाही झालं तर पर्यायी व्यवस्था शोधावी लागते. आता ही सगळी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. याचं कारण म्हणजे भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीचे निर्णय घेत आहे. आता चार्ट 4 तास आधी लागणार नाही तर 24 तास आधी तयार होणार आहे. इतकंच नाही तर बुकिंग केल्यानंतर तुमचं तिकीट कन्फर्म होणार की नाही ते देखील तुम्हाल कळू शकणार आहे.
भारतीय रेल्वेनं आतापर्यंत वेटिंग तिकीट घेतल्यावर चार्ट तयार होईपर्यंत वाट बघावी लागायची. कधी तिकीट कन्फर्म होतं, कधी RAC मिळतं, तर कधी शेवटच्या क्षणी प्रवास रद्द करावा लागतो. पण आता ही अनिश्चितता दूर होणार आहे. कारण IRCTC अॅप आणि वेबसाइटवर तिकीट बुक करतानाच कन्फर्म तिकीट होण्याची शक्यता म्हणजेच Confirmation Probability दाखवली जाईल.
advertisement
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, सामान्य दिवसांमध्ये सुमारे 26 टक्के वेटिंग तिकिटं शेवटी कन्फर्म होतात. पण सणासुदीच्या काळात ही शक्यता घटते. यामागचं कारण म्हणजे 60 दिवस आधी बुक केलेल्या तिकिटांचं रद्द होण्याचं प्रमाण फारच कमी असतं. तरीही सुमारे 21 टक्के प्रवासी कन्फर्म तिकीट घेतल्यानंतर प्रवास रद्द करतात. चार्ट तयार झाल्यानंतरही काही प्रवासी ट्रेन पकडत नाहीत. ही रद्द झालेली किंवा रिकामी राहिलेली तिकिटं मग वेटिंग यादीतील प्रवाशांना दिली जातात.
advertisement
प्रत्येक स्लीपर किंवा थर्ड एसी कोचमध्ये सरासरी 72 सीट्स असतात. यामध्ये 17 ते 18 वेटिंग नंबरपर्यंतची तिकिटं सहज कन्फर्म होण्याची शक्यता असते. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये 8 ते 10 स्लीपर कोच असतात. त्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये किमान 75–80 वेटिंग तिकीटं कन्फर्म होऊ शकतात. मात्र तिथे तुम्हाला किती टक्के कन्फर्म होईल त्याची पॉसिबलिटी दाखवत आहे. साधारण 40 टक्क्यांहून खाली तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता खूप कमी मानली जाते.
advertisement
IRCTC अॅपवर किंवा वेबसाइटवरून तिकीट बुक करताना आता High, Medium, Low अशा टॅग्जद्वारे ही शक्यता दाखवली जाईल. म्हणजे बुक करतानाच समजेल की तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाच्या तयारीची गडबड वाचेल आणि निर्णयही वेळेवर घेता येईल. रेल्वे आता चार्ट 4 तासांऐवजी 24 तास आधी तयार करण्याचा विचार करत आहे. यामुळे आणखी लवकर स्पष्टता मिळेल आणि प्रवाशांसाठी पुढचा प्लॅन तयार करणं अधिक सोपं होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 2:16 PM IST
मराठी बातम्या/मनी/
IRCTC Confirm Ticket : वेटिंग तिकीट घेताय? आता बुक करतानाच कळणार ते कन्फर्म होणार की नाही!