फेसबुकवर मारिया नावाच्या महिलेबरोबर ओळख झाली, तिने विश्वास संपादन केला आणि गोल्ड ट्रेडिंगचं आमिष दाखवलं. पुढच्याच टप्प्यात तिने WhatsApp वरून एक लिंक पाठवली आणि नावाचं अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितलं. एकदा अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर खरा खेळ सुरू झाला. पैसे गुंतवा, नफा काही दिवसांत मिळेल असं सांगून तिने फिर्यादीकडून लाखोंची गुंतवणूक करवून घेतली. पण नफा तर सोडाच, मूळ गुंतवणूकही परत मिळाली नाही. विचारणा केली असता तिने नवं कारण पुढे केलं.
advertisement
मनी लॉन्ड्रिंगमुळे तुमचं अकाउंट सस्पेक्टेड झालं आहे. गुंतवणूक परत घ्यायची असेल तर 6 लाख 13 हजार 647 रुपये भरावे लागतील असं महिलेनं सांगितलं. पैसे खात्यावर येणार या आनंदात काहीच सुचेन. कोणताही मागचा पुढचा विचार न करता महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रक्कम भरली. त्यानंतर वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र मारियाकडून कोणतंही उत्तर आलं नाही. ना नफा, ना मूळ रक्कम… तेव्हा त्याला समजलं, हा डाव होता. फसवण्याचा आपल्याला जाळ्या अडकवण्याचा आणि लुटण्याचा डाव होता.
ही संपूर्ण घटना 4 जुलै ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत घडली असून, फिर्यादीने अखेर 4 ऑक्टोबरला रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मारिया आणि तिच्या कंपनीच्या नावाच्या कंपनीसह सर्व खातेदारांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4), 319(2) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(सी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
हे रत्नागिरीतल्या एका व्यक्तीसोबत जरी घडलं असलं तरी तुमच्यासोबत देखील घडू शकतं. कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसू नका. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. असा कमी वेळात कुठेच पैसे दुप्पट होत नाहीत. भुलथापा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. अनोळखी अॅप, लिंक, यापासून सावध राहा. तुमची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका.