रत्नागिरी जिल्ह्यांतील 50 हजारहून अधिक लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल 50,476 महिलांची नावे अपात्र ठरवून रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक महिला चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेत असल्याचे आढळून आलं. जिल्ह्यात एकूण 1,08,886 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र त्यातील जवळपास निम्म्या अर्जदारांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
प्रशासनाने दोन टप्प्यांतून तपासणी करून पात्रतेची खातरजमा केली. पहिल्या टप्प्यात महिला नोकरी, व्यवसाय करत असल्याचे आढळले, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 5,421 महिलांची नावे रद्द करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार, सरकारी नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेत असलेल्या महिलांना ही योजना लागू होत नाही. तरीही अशा अनेक महिलांनी लाभ घेतल्याचे उघड झाले. यामुळे रत्नागिरी 878, दापोली 812, खेड 808, गुहागर 558, मंडणगड 555, लांजा 498, संगमेश्वर 462 आणि राजापूर 449 तालुक्यांतील हजारो महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे.
advertisement
'या'3 सरकारी स्कीम आहेत जबरदस्त! वयाच्या 30 वर्षी करा 500 ची गुंतवणूक, व्हाल मालामाल
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, पात्र महिलांपर्यंतच योजनांचा लाभ पोहोचावा यासाठीच ही फेरतपासणी केली जात आहे. मात्र एका जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी निघाल्याने योजनेची विश्वसनियता आणि अंमलबजावणी प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. सतत समोर येणाऱ्या घोळ आणि घोटाळ्यांमुळे लाडकी बहीणवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभेत घाईघाईनं ही योजना राबवली, आता अनेक महिला अपात्र ठरत आहेत. त्यांच्यावर काय करावाई होणार असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
तुमचं जन-धन खातं आहे? करा 'हे' काम अन्यथा बंद होईल अकाउंट, मिळणार नाही फायदे
लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही. रक्षाबंधनाआधी 8 ऑगस्ट रोजी जुलैचा हप्ता महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. यामध्ये ज्या महिलांची नावं वगळण्यात आली त्यांना लाभ मिळणार नाही. तुमचं नाव वगळण्यात आलं की नाही ते पाहण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नाव पाहावं लागेल. तिथे तुम्हाला लॉगइन करुन संपूर्ण लिस्ट तपासावी लागेल. लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.