RBI कडून डॉलर विक्रीत मोठी घट
नोव्हेंबर 2024 मध्ये RBI ने 20.2 अब्ज डॉलर विकले होते, तर डिसेंबरमध्ये विक्री 5 अब्ज डॉलरने घटून ती 15.2 अब्ज डॉलरवर आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर व्यापारी युद्धाच्या भीतीमुळे अमेरिकन डॉलरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. ज्यामुळे RBI ला हस्तक्षेप करावा लागला.
advertisement
गेल्या दोन महिन्यांत RBI ने एकूण 35.4 अब्ज डॉलर (सुमारे 30.73 लाख कोटी रुपये) खर्च करून रुपयाला घसरण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला.
Salary Hikeसाठी 2025 वाईट वर्ष, वर्षभर मेहनत करून किती टक्के पगार वाढ मिळणार
डिसेंबर महिन्यात RBI ने 69 अब्ज डॉलर विकले आणि 53.9 अब्ज डॉलर खरेदी केले. तर फॉरवर्ड सेलिंग (आगामी तारखेसाठी डॉलर विक्री) देखील वाढली असून, नोव्हेंबरच्या 58.9 अब्ज डॉलरवरून डिसेंबरमध्ये 67.9 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. RBI सतत डॉलर विकून बाजारातील रुपयांची उपलब्धता नियंत्रित करत आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चलनातील चढ-उतार रोखता येतील.
रुपयाच्या घसरणीमुळे महागाईत वाढ
रुपयाच्या किमतीत घट झाल्याने आयात महाग होते, ज्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या आणि खाद्य तेलाच्या किंमतींवर होतो. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या मते, रुपया 5% घसरल्यास महागाईत 0.30-0.35% वाढ होऊ शकते.
शेअर बाजारात मोठी उलथापालथ; दुसऱ्यांमुळे या कंपनीने गमावले 84 हजार कोटी
RBI च्या हस्तक्षेपामुळे रुपया अन्य 40 चलनांच्या तुलनेत मजबूत झाला आहे. मात्र Trade Weighted Real Effective Exchange Rate जानेवारी 2025 मध्ये 107.13 वरून 104.82 पर्यंत घसरला आहे.
विदेशी गुंतवणूकदारांची मोठी विक्री आणि विदेशी गंगाजळीतील घट
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) जानेवारी 2025 मध्ये 87,375 कोटी रुपयांची विक्री केली. जी मागील काही वर्षांतील सर्वाधिक मासिक विक्रींपैकी एक आहे.परकीय चलन साठा (Forex Reserves) 7 फेब्रुवारीपर्यंत 63 अब्ज डॉलरने घसरून 638 अब्ज डॉलरवर आला आहे, जो ऑक्टोबर 2024 मध्ये 701 अब्ज डॉलरवर होता.
RBIची धोरण काय?
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, बँक आपल्या धोरणावर ठाम आहे आणि गरज पडल्यास बँक अधिक हस्तक्षेप करू शकते. रुपयाच्या घसरणीचा देशाच्या निर्यातीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र त्याचवेळी आयातीच्या खर्चामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.