आकाश अंबानी म्हणाले की, जामनगरमध्ये कार्यान्वित होणारी AI पायाभूत सुविधा केवळ जामनगरला या क्षेत्रात आघाडीवर ठेवणार नाही तर जगातील सर्वोत्कृष्टांमध्ये स्थान मिळवेल. आम्ही जामनगरमध्ये आधीच त्याचे बांधकाम सुरू केले आहे आणि आम्हाला ते 24 महिन्यांच्या विक्रमी वेळेत खऱ्या जामनगर शैलीत पूर्ण करायचे आहे." असंही ते म्हणाले.
“ईशा, अनंत आणि मी तुमच्यासाठी वचनबद्ध आहोत आणि आम्ही मिळून रिलायन्सचा विकास करू आणि जामनगर हे नेहमीच आमच्या रिलायन्स कुटुंबाचं भूषण असेल याची खात्री करू. माझ्या पालकांसह रिलायन्स कुटुंबासाठी ही आमची वचनबद्धता आहे.” माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या युगात शहराला जागतिक पातळीवर आघाडीवर आणण्याचे रिलायन्सचं उद्दिष्ट असल्याचं आकाश अंबानी यांनी सांगितलं.
advertisement
रिलायन्सची जामनगर रिफायनरी 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 28 डिसेंबर 1999 रोजी स्थापित, रिफायनरी जगातील सर्वात मोठे रिफायनिंग हब बनली आहे. आज ही संस्था एक अभियांत्रिकी चमत्कार आहे जी भारताच्या औद्योगिक अभिमानाला मूर्त रूप देते.
सुरुवातीला, रस्ते, वीज किंवा पिण्याचे पाणी यासारख्या पायाभूत सुविधा नसलेल्या एका वेगळ्या आणि शुष्क भागात मोठी रिफायनरी बांधण्याच्या व्यवहार्यतेबद्दल अनेकांना साशंकता होती. या आव्हानांना न जुमानता, रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी टीकाकारांना नकार दिला आणि जामनगरला जागतिक दर्जाचे औद्योगिक आणि तंत्रज्ञान केंद्र बनवलं.
धीरूभाईंच्या नेतृत्वाखाली, तीव्र चक्रीवादळ आणि वाहतुकीची आव्हाने यांसारख्या अडथळ्यांवर मात करून रिफायनरी अवघ्या 33 महिन्यांत बांधली गेली. आज, जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्समध्ये फ्लुइडाइज्ड कॅटॅलिटिक क्रॅकर (FCC), कोकर, अल्किलेशन, पॅराक्सिलीन, पॉलीप्रॉपिलीन, रिफायनरी ऑफ-गॅस क्रॅकर (ROGC) आणि पेटकोक गॅसिफिकेशन प्लांट्ससह जगातील सर्वात मोठी युनिट्स आहेत.