कोल्हापूर : प्लास्टिकपासून बनवलेली चटई आपण पाहिली असेल किंवा वापरत देखील असाल. मात्र गवतापासून देखील चटई बनवली जाते, हे अनेकांना महिती नसेल. सांगली जिल्ह्यातील प्रा. बी. एस. चव्हाण यांनी हे करून दाखवलं आहे. एका विशिष्ट प्रकारच्या गवतापासून ते चटई बॅग, टेबल रनर, गादी मॅट बनवतात. तसेच या व्यवसायातून चव्हाण कुटुंबीयाचं वर्षाकाठी साधारण सहा ते सात लाखांच उत्पन्न होतं. संपूर्ण महाराष्ट्रात असा व्यवसाय करणारे ते एकटेच असल्याचं लोकल18 सोबत बोलताना प्रा. चव्हाण यांनी सांगितलं.
advertisement
कशी सुचली कल्पना?
सांगली जिल्ह्यातील प्रा. बी एस चव्हाण हे हस्तकलेच्या क्षेत्रात बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. या क्षेत्रात काम करत असताना ते एका ठिकाणी प्रदर्शनाला गेले होते. तिथे त्यांनी गवतापासून चटई आणि वेगवेगळ्या गृहउपयोगी वस्तू केलेल्या निदर्शनास आल्या. इथून त्यांना ही कल्पना सुचली. या गवताला गोल्डन ग्रास असं म्हटलं जातं. विशेषतः बंगालमध्ये ही वनस्पती आढळते. त्यापासून या वस्तू बनवल्या जातात. यामध्ये थ्री फोल्डर आणि फोर फोल्डर चटईचा समावेश आहे. टेबल मॅट, विविध प्रकारच्या बॅग आणि टोपी देखील यापासून बनवल्या जातात.
कोल्हापूरच्या रस्त्यावर 'ती' परत अवतरली, गाजवलं होतं 80 चं दशक, आजही कुणी करणार नाही बरोबरी!
उद्योगातून महिलांना रोजगार
चव्हाण यांची चरक स्वास्थ्य बहुउद्देशीय संस्था कार्यरत आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी ही संस्था महिलांच्या बचत गटातून देखील कार्यरत आहे. संस्थ्येच्या मार्फत महिलांनाही या उद्योगातून रोजगार मिळतो. तसेच या महिला मुंबई, दिल्ली, पुणे, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जातात. तसेच विविध प्रदर्शनात देखील सहभागी होत असतात, असं प्रा. बी एस चव्हाण यांनी सांगितलं.
कोल्हापुरात प्रदर्शन
भारत सरकारच्या वन मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हस्तकला) यांच्या मार्गदर्शनाखाली भारत हाउसिंग सोसायटी हॉल, आठवी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर येथे गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला आणि हातमाग प्रदर्शनाचे व विक्री दालनाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या प्रदर्शनामध्ये विविध 29 राज्यातील 50 कारागीर 50 स्टॉलसह उपस्थित राहतील. एकूण 50 स्टॉलवर हस्तकला कारागीर आपल्या खास कलाकृती या प्रदर्शनात सादर करणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर आसपासच्या कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे.