काल (13 मे) बीएसई सेन्सेक्स 111.66 अंक अर्थात 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 72,776 अंकांवर बंद झाला होता. एनएसईचा निफ्टी 48.85 अंक अर्थात 0.22 टक्क्यांच्या वाढीसह 22,104.05 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी मात्र बाजारात तेजी दिसून आली. गुंतवणूकदारांचा कल खरेदीकडे राहिला.
शेअर बाजारात तेजीची ही आहेत कारणं
कमकुवत जागतिक संकेतांदरम्यान मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारात खरेदीचा कल होता. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी बोलताना शेअर बाजाराबाबत भाष्य केलं. खरेदी करून ठेवा, चार जूननंतर शेअर बाजार तेजीत येईल, असं गृहमंत्री शहा यांनी या वेळी सांगितलं.
advertisement
हेक्सावेअरच्या आयपीओसाठी कार्लाइलने पाच इन्व्हेस्टमेंट बँकांची नावं केली फायनल
अमेरिकी खासगी इक्विटी फर्म कार्लाइलने हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजच्या आयपीओ साठी पाच इन्व्हेस्टमेंट बँकांची नावं फायनल केली आहेत. कार्लाइल या आर्थिक वर्षात हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करणार आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा कॅपिटल, सिटी आणि जेपी मॉर्गन या आयपीओसाठी लीड बँक असतील. तसंच इतर दोन बँकांमध्ये आयआयएफएल कॅपिटल आणि एचएसबीसी सिक्युरिटीजचा समावेश आहे.
विन्सॉल इंजिनिअर्सचा आयपीओ लिस्ट - 75 रुपयांचा शेअर 365 रुपयांना लिस्ट
सौर आणि पवन ऊर्जा उत्पादक कंपन्यांना सेवा पुरवणाऱ्या विन्सॉल इंजिनीअर्सच्या शेअर्सची मंगळवारी एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एंट्री झाली. आयपीओ अंतर्गत प्रति शेअरचा दर 75 रुपये असल्याचं जारी करण्यात आलं; पण मंगळवारी एनएसई एसएमईवर त्याचा प्रवेश 365 रुपयांनी झाला. याचा अर्थ लिस्टिंगवेळी आयपीओ गुंतवणूकदारांना 368.67 टक्के वाढ मिळाली.