TRENDING:

Share Market: आणखी काही दिवस धीर धरा, शेअर बाजारात येणार पैशाचा महापूर; गुंतवणूकदारांनी चूक करू नये

Last Updated:

Share Market Prediction: सध्या शेअर बाजारात घसरण सुरू असली तरी पुढील काही महिन्यात बाजारात पैशांचा प्रचंड ओघ येणार आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी घाईगडबड न करता योग्य वेळी निर्णय घ्यावा असा सल्ला देण्यात आलाय.

advertisement
मुंबई: भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी घसरण सुरू आहे. बाजारातील या घसरणीचा फटका सर्वच गुंतवणुकदारांना बसत आहे. अशाच छोट्या गुंतवणुकदारांनी बाजारात सध्या तरी पैसे लावू नये, असा सल्ला दिला जात आहे. अशात गुंतवणुकदारांसाठी दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. शेअर बाजारात कधी तेजीचे वारे वाहतात, तर कधी मंदीचा फटका बसतो. सध्या निफ्टी 30,000 च्या पातळीपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध शेअर बाजार विश्लेषक आणि केडियानॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी ही भविष्यवाणी केली आहे. त्यांचा दावा आहे की, येत्या काही महिन्यांत बाजारात पैशाचा प्रचंड ओघ येणार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर तेजी पाहायला मिळेल.
News18
News18
advertisement

सीएनबीसी आवाजचे मॅनेजिंग एडिटर अनुज सिंघल यांच्याशी संवाद साधताना, केडिया यांनी अशा भविष्यवाणी केली आहे, मागील 4-5 महिन्यांपासून घसरण आणि तोटा सहन करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी येणार आहे. सध्या बाजारात अनिश्चितता असून, अनेक गुंतवणूकदार गोंधळून गेले आहेत. मात्र, केडिया यांनी दावा केला आहे की, ही स्थिती फार काळ टिकणार नाही. पुढील आठवड्यात सकारात्मक बदल पाहायला मिळेल.

advertisement

निम्म्या किंमतीला मिळतोय टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर, गुंतवणुकदारांनी काय करावे?

निफ्टी 30,000 कधी?

केडिया यांनी सांगितले की, पुढील 12 ते 15 महिन्यांत निफ्टी 30,000 च्या स्तरावर पोहोचू शकतो. मात्र, त्यांनी यावर जोर दिला की, जो गुंतवणूकदार तासाभराचा तोटा सहन करू शकत नाही, त्याला दीर्घकालीन बाजारात टिकणे कठीण होईल. गुंतवणूकदारांनी संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.

advertisement

या दोन स्टॉक्समध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता

केडिया यांनी स्टील क्षेत्रातील काही स्टॉक्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी विशेषतः JSW एनर्जी आणि जिंदाल स्टेनलेस यांचे नाव घेतले आहे. या कंपन्यांची स्थिती मजबूत आहे आणि बाजारात सकारात्मक संकेत मिळताच त्यांचे मूल्य झपाट्याने वाढू शकते.

शेअर बाजारापासून दूर राहणे शहाणपणाचे; भविष्यवाणी ऐकून गुंतवणूकदारांना बसेल धक्का

advertisement

रुपया आणि बाजाराची दिशा

दीर्घकालीन विचार करता, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होत असतो. मात्र, जेव्हा रुपया बळकट होतो, तेव्हा शेअर बाजारात तेजी पाहायला मिळते. मागील काही दिवसांत रुपयाने चांगली मजबूती दाखवली आहे, मात्र यावर विशेष चर्चा झालेली नाही. सरकारने कर कपात केली आहे, व्याजदर घटवले आहेत आणि जर सरकार आपल्या खर्च धोरणांमध्ये वाढ करत राहिली, तर बाजार आणखी मजबूत होईल.

advertisement

30,000 चा टप्पा...

केडिया यांच्या मते, निफ्टी 30,000 वर पोहोचेल, पण गुंतवणूकदारांनी संयम ठेवणे गरजेचे आहे. बाजार 23,150 च्या पुढे गेला, तर 25,000 ची दिशा गाठेल. त्यानंतर काही प्रमाणात घसरण होईल आणि मग 30,000 पर्यंतचा प्रवास ठरवला जाईल. डॉलर 88 वरून 81 वर आला, तर त्याचा थेट परिणाम निफ्टीवर 22-23% वाढीच्या स्वरूपात दिसेल. तसेच, सरकारने कर कपात आणि खर्च वाढवला तर, 25-30% परतावा मिळणे सहज शक्य आहे.

योग्य वेळी निर्णय घ्या...

गुंतवणूकदारांनी घाईगडबड करू नये, असे केडिया यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मी हे सांगत नाही की, सर्व गुंतवणूक विकून शेअर बाजारात पैसे टाका. पण घाबरून विक्री करण्याची घाई करू नका. बाजाराच्या स्थितीवर लक्ष ठेवा आणि योग्य वेळी निर्णय घ्या.

मराठी बातम्या/मनी/
Share Market: आणखी काही दिवस धीर धरा, शेअर बाजारात येणार पैशाचा महापूर; गुंतवणूकदारांनी चूक करू नये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल