निम्म्या किंमतीला मिळतोय टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर, छोट्या गुंतवणुकदारांनी काय करावे? एक्सपर्टनी दिला मोलाचा सल्ला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Tata Motors Share Target Price: टाटा मोटर्सने गेल्या ५ वर्षात ३००% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. मात्र गेल्या ६ महिन्यात टाटा मोटर्सचे शेअर्स ४०% घसरून ६७६ रुपयांच्या पातळीवर पोहोचले. भविष्यात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता एक्सपर्टनी व्यक्त केली आहे.
मुंबई: टाटा ग्रुपच्या शेअर्सनी गेल्या दोन दशकात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. यात टाटा स्टील, टीसीएस आणि टाटा मोटर्स यासह अन्य कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसात शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळत आहे. अशात जर तुम्ही टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये पैसा लावणार असेल तर ही मोठी सुवर्ण संधी असेल.
शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती घसरल्या आहेत. यात टाटा ग्रुपच्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. बाजारातील या घसरणीत टाटा मोटर्सच्या किंमती विक्रमी स्तरावरून तब्बल ४० टक्के घसरल्या आहेत. अशात मार्टेक एक्सपर्टच्या मते हे शेअर्स फार स्वस्त झाले आहेत.
शेअर बाजारापासून दूर राहणे शहाणपणाचे; भविष्यवाणी ऐकून गुंतवणूकदारांना बसेल धक्का
गेल्या वर्षी जुलै महिन्यात टाटा मोटर्सचा शेअर १ हजार १७९ रुपयांच्या स्तरावर पोहोचला होता. मात्र ऑगस्टनंतर कंपनीच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली. आता हा शेअर ६७६ रुपयांच्या स्तरावर आहे.
advertisement
झहीर-सागरिकाने मुंबईत घेतले लक्झरी घर, 2 हजार 600sq फूटासाठी मोजले इतके कोटी
टाटा मोटर्सच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात २७ टक्के नेगेटिव्ह रिटर्न दिला आहे. मात्र गेल्या पाच वर्षाचा विचार केला तर गुंतवणुकदारांना ३०० टक्के रिटर्न मिळाला आहे. कंपनी बाजारात आल्यापासून ते आतापर्यंतचा विचार केला तर रिटर्न २ हजार टक्के इतका आहे. जानेवारी १९९९ साली टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत ३२ रुपये इतकी होती आता ६७६ इतकी आहे.
advertisement
ईडीने माझे 500 ते 700 कोटी जप्त केले; 1 हजार कोटींची संपत्ती सोडून...
मार्केट एक्सपर्ट संदीप सबरवाल यांनी टाटा मोटर्सचे शेअर खरेदी करण्याबद्दल मत व्यक्त केले. या स्टॉकबद्दल अजूनही काही अनिश्चितता आहेत परंतु या स्टॉकमध्ये एक मोठा करेक्शन आला आहे त्यामुळे किंमत आणि मूल्यांकनाच्या बाबतीत तो खूपच आकर्षक दिसतो. त्यांनी सांगितले की टाटा मोटर्सचा शेअर ११७६ रुपयांच्या पातळीवरून ७०० रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळे या पातळींवरून शेअर चांगला उसळी घेऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 18, 2025 2:02 PM IST
मराठी बातम्या/मनी/
निम्म्या किंमतीला मिळतोय टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर, छोट्या गुंतवणुकदारांनी काय करावे? एक्सपर्टनी दिला मोलाचा सल्ला