Zaheer Khan luxury Apartment: झहीर- सागरिकाने मुंबईत खरेदी केले लक्झरी घर, 2 हजार 600sq फूटासाठी मोजले इतके कोटी

Last Updated:
Zaheer Khan Buys Luxury Apartment: भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खानने मुंबईत मोठी गुंतवणूक केली आहे. त्याने पत्नी सागरिका घाटगेसोबत मुंबईतील लोअर परळ परिसरात मुंबईत लक्झरी घर खरेदी केले आहे.
1/7
माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानने त्याची पत्नी सागरिका घाटगे आणि त्याचा भाऊ शिवजीत घाटगे यांच्यासोबत मुंबईत २ हजार ६०० चौरस फूटाचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. मुंबईतील लोअर परळमधील या आलिशान अपार्टमेंटची किंमत ११ कोटी रुपये आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानने त्याची पत्नी सागरिका घाटगे आणि त्याचा भाऊ शिवजीत घाटगे यांच्यासोबत मुंबईत 2 हजार 600 चौरस फूटाचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. मुंबईतील लोअर परळमधील या आलिशान अपार्टमेंटची किंमत 11 कोटी रुपये आहे.
advertisement
2/7
झहीर खानच्या या घराच्या खरेदी संदर्भातील माहिती स्क्वेअर यार्ड्सने दिली. रिअल इस्टेट कन्सल्टंट स्क्वेअर यार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी मालमत्ता नोंदणी कागदपत्रांची तपासणी केली आहे. या व्यवहाराची नोंदणी फेब्रुवारी २०२५ मध्ये झाली आहे.
झहीर खानच्या या घराच्या खरेदी संदर्भातील माहिती स्क्वेअर यार्ड्सने दिली. रिअल इस्टेट कन्सल्टंट स्क्वेअर यार्ड्सने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी मालमत्ता नोंदणी कागदपत्रांची तपासणी केली आहे. या व्यवहाराची नोंदणी फेब्रुवारी 2025 मध्ये झाली आहे.
advertisement
3/7
ही मालमत्ता इंडियाबुल्स स्काय येथे असून इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट लिमिटेडने विकसित केली आहे. या अपार्टमेंटचे कार्पेट एरिया २,१५८ चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया २,५९० चौरस फूट आहे. त्यात तीन कार पार्किंगची जागा आहे.
ही मालमत्ता इंडियाबुल्स स्काय येथे असून इक्विनॉक्स इंडिया डेव्हलपमेंट लिमिटेडने विकसित केली आहे. या अपार्टमेंटचे कार्पेट एरिया 2,158 चौरस फूट आणि बिल्ट-अप एरिया 2,590 चौरस फूट आहे. त्यात तीन कार पार्किंगची जागा आहे.
advertisement
4/7
या करारात ६६ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांच्या नोंदणी शुल्कचा समावेश आहे. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) नुसार, इंडियाबुल्स स्काय हा तीन एकर जागेत पसरलेला 'रेडी-टू-मूव्ह-इन' निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पुनर्विक्री मालमत्तेची सरासरी किंमत सध्या प्रति चौरस फूट ४९,०९६ रुपये आहे.
या करारात 66 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपयांच्या नोंदणी शुल्कचा समावेश आहे. रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (RERA) नुसार, इंडियाबुल्स स्काय हा तीन एकर जागेत पसरलेला 'रेडी-टू-मूव्ह-इन' निवासी प्रकल्प आहे. या प्रकल्पातील पुनर्विक्री मालमत्तेची सरासरी किंमत सध्या प्रति चौरस फूट 49,096 रुपये आहे.
advertisement
5/7
झहीर खानने खरेदी केलेले घर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने लोअर परळ ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १८.३ किलोमीटर अंतरावर आहे. लोअर परळ हा मुंबईतील पॉश भागांपैकी एक आहे. जिथे अनेक चांगल्या निवासी आणि व्यावसायिक जागा आहेत. येथे अनेक रेस्टॉरंट्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस देखील आहेत.
झहीर खानने खरेदी केलेले घर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने लोअर परळ ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 18.3 किलोमीटर अंतरावर आहे. लोअर परळ हा मुंबईतील पॉश भागांपैकी एक आहे. जिथे अनेक चांगल्या निवासी आणि व्यावसायिक जागा आहेत. येथे अनेक रेस्टॉरंट्स आणि कॉर्पोरेट ऑफिसेस देखील आहेत.
advertisement
6/7
आयपीएल २०२५ पूर्वी झहीर खानने लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. झहीरच्या आधी, गौतम गंभीर २०२२ च्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक होता. त्यानंतर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक बनला आणि त्याने KKRला विजेतेपद देखील मिळून दिले. गंभीरने पद सोडल्यापासून लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक पद रिक्त होते.
आयपीएल 2025 पूर्वी झहीर खानने लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. झहीरच्या आधी, गौतम गंभीर 2022 च्या हंगामात लखनौ सुपरजायंट्सचा मार्गदर्शक होता. त्यानंतर गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक बनला आणि त्याने KKRला विजेतेपद देखील मिळून दिले. गंभीरने पद सोडल्यापासून लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक पद रिक्त होते.
advertisement
7/7
झहीर खानने भारतासाठी ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे ३११, २८२ आणि १७ विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी २०१७ लग्न मध्ये केले होते.
झहीर खानने भारतासाठी 92 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 17 टी-20 सामन्यांमध्ये अनुक्रमे 311, 282 आणि 17 विकेट्स घेतल्या आहेत. झहीरने बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगेशी 2017 लग्न मध्ये केले होते.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement