अपोलो मायक्रो सिस्टिम्स (Apollo Micro Systems) या स्मॉल-कॅप कंपनीचे शेअर्स 29 जानेवारी रोजी BSE वर 6% नी वाढले, आणि शेअरची किंमत 125.80 रुपयांवर पोहोचली. या वाढीमागचे प्रमुख कारण म्हणजे कंपनीला DRDO कडून मोठा ऑर्डर मिळाला आहे.
कंपनीला मिळाले तगडे संरक्षण क्षेत्राचे ऑर्डर
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार अपोलो मायक्रो सिस्टिम्सने 28 जानेवारी रोजी शेअर बाजार नियामकांकडे माहिती दिली की संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) कडून 7.37 रुपयांची कोटींचा ऑर्डर मिळाला आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.
advertisement
नोव्हेंबर 2023 मध्ये देखील कंपनीला DRDO कडून ऑर्डर मिळाली होती. 22 नोव्हेंबर 2023 रोजी DRDO आणि अदानी ग्रुपकडून 4.65 कोटींची ऑर्डर मिळाली होती. 3 डिसेंबर 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि एका खाजगी कंपनीकडून 21.42 कोटींची ऑर्डर मिळाली.
शेअरची कामगिरी आणि गुंतवणुकीची संधी
2024 मध्ये या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत 15% वाढ
जानेवारी महिन्यातच अपोलो मायक्रो सिस्टिम्सच्या शेअरमध्ये 7% वाढ झाली आहे.
52 आठवड्यांचे निकाल
23 ऑक्टोबर 2023: 88.10 रुपये (सर्वात कमी किंमत)
21 जानेवारी 2024: 157 रुपये (सर्वाधिक किंमत)
Share Market: Budget 2025 आधीच बुक करा रेल्वेचे 3 शेअर्स, बुलेट ट्रेनच्या स्पीडनं देतील रिटर्न्स!
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची माहिती
शेअरहोल्डिंग पॅटर्न (डिसेंबर 2024):
55.12% – प्रमोटर्सची हिस्सेदारी
43.28% – गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार
उर्वरित FII आणि विमा कंपन्यांकडे
सांगलीच्या डॉक्टरांची कमाल, 5 मेंढ्यांच्या पालनातून मालामाल, एका कोकराला 3 लाखांचा भाव!
पैसे गुंतवावेत का, काय करावे? गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?
संरक्षण क्षेत्रात सरकार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्यामुळे डिफेन्स शेअर्समध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. DRDO, BEL, अदानी यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत ऑर्डर्स मिळाल्यामुळे कंपनीचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. 4 फेब्रुवारी रोजी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर होणार आहेत, त्यानंतर आणखी तेजी येऊ शकते.
(डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)