TRENDING:

Share Market: वर्षाअखेरीस शेअर बाजारात भूकंप, 'या' 3 कारणांनी झटक्यात बुडाले 3.5 लाख कोटी

Last Updated:

गुंतवणूकदारांचे काही सेकंदात 3.5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारातील हा भूकंप हादरवून टाकणारा आहे. यापूर्वी देखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला होता. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी जोरदार झटका लागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सरत्या वर्षात गुंतवणूकदारांना जोर का झटका बसला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना अक्षरश: डोकं धरुन बसण्याची वेळ आली. शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला आहे. गुंतवणूकदारांचे काही सेकंदात 3.5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शेअर बाजारातील हा भूकंप हादरवून टाकणारा आहे. यापूर्वी देखील कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला होता. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी जोरदार झटका लागला आहे.
शेअर मार्केट
शेअर मार्केट
advertisement

वर्षाच्या शेवटच्या दिवशीही शेअर बाजारात घसरण सुरूच होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास 700 अंकांनी घसरला. त्याच वेळी, निफ्टी जवळपास 180 अंकांनी घसरला आणि 23,500 च्या खाली गेला. सर्वात मोठी घसरण आयटीच्या शेअर्समध्ये दिसून आली. आज पहिल्या एक तासात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे साडेतीन लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 437.82 लाख कोटी रुपयांवर घसरले, जे सोमवार, 30 डिसेंबरला 441.35 लाख कोटी रुपये होते.

advertisement

ब्रॉडर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचं दिसून आलं. सकाळी 10.20 च्या सुमारास बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.81 टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.38 टक्क्यांनी घसरला. कॅपिटल गुड्स वगळता बीएसईचे सगळे सेक्टोरल इंडेक्स लाल रंगात आहेत, सोप्या भाषेत सांगायचं तर मार्केट कोसळलं आहे. आयटी निर्देशांक अडीच टक्क्यांहून अधिक घसरला होता.

तज्ज्ञांच्या मते, FIIs मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. त्याचे परिणाम जागतिक आणि राष्ट्रीय दोन्ही बाजारपेठांवर दिसून आले. मागच्या 2 आठवड्यापासून गुंतवणूकदार शेअर मार्केटमधून आपले पैसे काढून घेत आहेत. 15,000 कोटी रुपयांहून अधिक पैसे हे शेअर मार्केटमधून काढले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम दिसून आला आहे.

advertisement

जागतिक बाजारपेठेत कमजोर संकेत

नवीन वर्षाच्या सुट्टीमुळे मंगळवारी आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील बहुतेक देशांचे शेअर बाजार बंद राहिले. वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ऑस्ट्रेलियन बाजारात भूकंप आला. जपान आणि दक्षिण कोरियामधील बाजारपेठा सुट्टीसाठी बंद होत्या, तर हाँगकाँगमध्ये काही तासांसाठीच शेअर मार्केट सुरु ठेवण्यात आलं होतं. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

Share Market: बुधवार आणि न्यू ईयरचं खास कनेक्शन, 32 वर्षांतला रेकॉर्ड मोडणार?

advertisement

डॉलर इंडेक्स मजबूत

डॉलरचं मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे तर रुपया कमजोर होत आहे. दुसरीकडे डॉलर इंडेक्स 108 वर पोहोचला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचा विषय आहे. त्याचा परिणाम आशियातील मार्केटवर नाकारात्मक होत आहे. विशेषत: भारतीय शेअर मार्केटवर त्यामुळे आगामी काळातही मार्केटमध्ये थोडी धीम्या गतीनं स्थिरता येईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

advertisement

नव्या वर्षात कसा असेल ट्रेंड

2025 ची सुरुवात ही बऱ्याचअंशी बजेटवर अवलंबून असणार आहे. GST मधील बदल, टॅक्स स्लॅब आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन शेअर मार्केटची दिशा अधिक स्पष्ट होईल. ब्रॉडर मार्केटवर जास्त दबाव आहे. त्यामुळे पैसे गुंतवण्याची किंवा काढण्याची घाई करू नये असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: वर्षाअखेरीस शेअर बाजारात भूकंप, 'या' 3 कारणांनी झटक्यात बुडाले 3.5 लाख कोटी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल