Share Market: बुधवार आणि न्यू ईयरचं खास कनेक्शन, 32 वर्षांतला रेकॉर्ड मोडणार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नवीन वर्षातील बाजाराचे पहिले सत्र बुधवारी आहे. 1992 पासून, नवीन वर्षातील बाजाराचे पहिले सत्र 32 वर्षांत 5 वेळा बुधवारी झाले. या पाचही दिवसांमध्ये काय साम्य होतं आणि कोणता नवा रेकॉर्ड शेअर मार्केटमध्ये होणार जाणून घेऊया.
मुंबई: सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाची आनंदाने उत्साहाने सुरुवात करत आहेत. नव्या वर्षात शेअर मार्केटमध्ये पुन्हा नवा विक्रम नोंदवला जाईल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. यावेळी 1 जानेवारी बुधवारी आला आहे. बँकेला सुट्टी असली तर शेअर मार्केट सुरू राहणार आहे.
बुधवार- 1 जानेवारी आणि शेअर मार्केटचं खास कनेक्शन आहे. त्यामुळे यावेळी 1 जानेवारीचा बुधवार गुंतवणूकदारांसाठी कसा असेल याची उत्सुकताही आहे. 2025 नव्या वर्षाची सुरुवात खूप आशादायी आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. आतापर्यंतच्या डेटाचा विचार करता हे नवीन वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगलं जाईल अशी आशा आहे.
advertisement
नवीन वर्षाचा पहिला दिवस बुधवार आहे. 1992 पासून, 32 वर्षांत, असे पाच वेळा घडले आहे की पहिल्या सत्राच्या बाजार बुधवारी होता आणि पाचही वेळा निफ्टीने सकारात्मक रिटर्न्स दिले आहेत.
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार, आजवरचा रेकॉर्ड पाहिला तर 2020 मध्ये 15%, 2014 मध्ये 31%, 2003 मध्ये 72% रिटर्न्स दिले आहेत. 1997 मध्ये 18% आणि 1992 मध्ये 36% रिटर्न्स दिले आहेत. या पाचही वर्षांमध्ये 1 जानेवारीला बुधवार होता आणि पाचही दिवसांमध्ये मार्केटच्या पहिल्या सत्रात जबरदस्त रिटर्न्स गेन करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळाली.
advertisement
येणारं वर्ष निफ्टीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंद घेऊन येईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 1 जानेवारी रोजी ट्रेडिंग सुरू राहणार आहे. बँकांना सुट्टी असली तर शेअर मार्केट सुरू राहील त्यामुळे ट्रेडिंग होणार आहे. नव्या वर्षात अनेक जण गुंतवणूकीसाठी मार्केटमध्ये उतरण्याची शक्यताही आहे.
(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं जोखमीचं आहे. कोणत्याही फायद्या तोट्यासाठी न्यूज18 मराठी जबाबदार राहणार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 31, 2024 1:24 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: बुधवार आणि न्यू ईयरचं खास कनेक्शन, 32 वर्षांतला रेकॉर्ड मोडणार?