बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. आज शेअर मार्केट सुरू राहणार आहे. इक्विटी, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स (EGR) यासह सर्व विभागांमधील उलाढाल होईल. 1 जानेवारी 2025 पासून कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहणार आहे.
Share Market: बुधवार आणि न्यू ईयरचं खास कनेक्शन, 32 वर्षांतला रेकॉर्ड मोडणार?
advertisement
संपूर्ण जानेवारी महिन्याबद्दल बोलायचे झाले तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त पहिली सुट्टी असेल, मात्र यावेळी ती रविवारी आली आहे, त्यामुळे रविवार असल्याने तसंही शेअर मार्केट बंद असतं. त्यामुळे ती सुट्टी अशी म्हणता येणार नाही. बाकी शनिवार आणि रविवार शेअर मार्केट तसंही सुरू नसतं.शनिवार-रविवार वगळता, जानेवारीच्या उर्वरित दिवसांत शेअर बाजार सामान्यपणे काम करेल आणि गुंतवणूकदारांना व्यवहार करता येईल.
1. 26 फेब्रुवारी 2025 (बुधवार) रोजी महाशिवरात्रीची सुट्टी
2. 14 मार्च 2025 (शुक्रवार) रोजी होळीची सुट्टी
3. ईद-उल-फित्र (रमजान ईद) 31 मार्च 2025 रोजी (सोमवार) सुट्टी
4. 10 एप्रिल 2025 (गुरुवार) रोजी श्री महावीर जयंतीची सुट्टी
5. 14 एप्रिल 2025 (सोमवार) रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी
6. 18 एप्रिल 2025 (शुक्रवार) रोजी गुड फ्रायडेची सुट्टी
7. 01 मे 2025 (गुरुवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी
8. 15 ऑगस्ट 2025 रोजी (शुक्रवार) स्वातंत्र्य दिनाची सुट्टी
9. 27 ऑगस्ट 2025 (बुधवार) रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी
10. 02 ऑक्टोबर 2025 (गुरुवार) रोजी महात्मा गांधी जयंती/दसऱ्याची सुट्टी
11. 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) दिवाळी लक्ष्मीपूजनाची सुट्टी.
12. 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा सुट्टी (बुधवार)
13. 05 नोव्हेंबर 2025 (बुधवार) रोजी श्री गुरु नानक देव यांच्या प्रकाश गुरु पर्व सुट्टी
14. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार) रोजी ख्रिसमसची सुट्टी
चार दिवस रविवारी आल्याने या वर्षातील चार सुट्ट्या कमी झाल्या आहेत. त्याची लिस्टही जारी करण्यात आली आहे. शनिवार रविवार व्यतिरिक्त 14 दिवस शेअर मार्केट बंद राहणार आहे.
26 जानेवारी 2025 (रविवार) रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी
06 एप्रिल 2025 (रविवार) रोजी श्री राम नवमीची सुट्टी
07 जून २०२५ (शनिवार) रोजी बकरीदची सुट्टी
06 जुलै 2025 (रविवार) रोजी मोहरमची सुट्टी
बुधवार- 1 जानेवारी आणि शेअर मार्केटचं खास कनेक्शन आहे. त्यामुळे यावेळी 1 जानेवारीचा बुधवार गुंतवणूकदारांसाठी कसा असेल याची उत्सुकताही आहे. 2025 नव्या वर्षाची सुरुवात खूप आशादायी आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. नवीन वर्षाचा पहिला दिवस बुधवार आहे. 1992 पासून, 32 वर्षांत, असे पाच वेळा घडले आहे की पहिल्या सत्राच्या बाजार बुधवारी होता आणि पाचही वेळा निफ्टीने सकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात चांगली होईल अशी आशा गुंतवणूकदारांना आहे.