कंपनीच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता
शेअर बाजारात अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट जाहीर करत असतात. नवकार अर्बन स्ट्रक्चर लिमिटेड (Navkar Urbanstructure) या कंपनीनेही मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स देणार आहे, तसेच स्टॉक स्प्लिटही होणार आहे. त्यामुळे कमी किमतीत जास्त शेअर्स मिळवण्याची संधी मिळणार आहे.
advertisement
2 शेअर्सवर 3 बोनस – काय आहे याचा फायदा?
कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, 2 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरसाठी 3 बोनस शेअर्स दिले जातील. यामुळे गुंतवणूकदारांचे होल्डिंग वाढणार आहे. शिवाय, कंपनी 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सचे दोन भाग करणार आहे. त्यामुळे शेअरची फेस व्हॅल्यू 1 रुपये होईल. बोनस शेअर्स मिळवण्यासाठी 21 मार्च 2025 ही महत्त्वाची तारीख ठरवण्यात आली आहे.
Bank Holiday: होळी आणि धुळवडमुळे या आठवड्यात 4 दिवस बंद राहणार बँक
स्टॉक स्प्लिटचा परिणाम
हा स्टॉक स्प्लिट कंपनीसाठी नवीन नाही. यापूर्वी 2022 मध्ये नवकार अर्बन स्ट्रक्चरने आपले शेअर्स 5 भागांमध्ये विभागले होते. त्या वेळी फेस व्हॅल्यू 10 रुपयांवरून 2 रुपये करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा स्टॉक स्प्लिट होणार असून, गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
शेअर बाजारात कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे?
शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 4% घसरण झाली आणि स्टॉक 16.20 रुपयांवर बंद झाला.मात्र, यावर्षी आतापर्यंत स्टॉक 42% वाढला आहे. मागच्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 10% वाढ झाली. एक वर्षात स्टॉक तब्बल 230% वाढला आहे, जो गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे.
PM Internship Scheme: उरले फक्त 48 तास, मोदी सरकारची ही खास स्कीम बंद होणार ,असा करा अर्ज
मार्केट कॅप आणि 52-वीक हाय-लो लेव्हल
मार्केट कॅप: 363.56 कोटी रुपये
52-वीक हाय: 21.39 रुपये
52-वीक लो: 4.20 रुपये
गुंतवणूकदारांनी काय करावे?
जर तुम्ही शेअर बाजारात कमी किमतीतील मल्टीबॅगर स्टॉक्स शोधत असाल, तर हा स्टॉक तुमच्या रडारवर ठेवण्यासारखा आहे. कंपनीचा बोनस आणि स्टॉक स्प्लिट गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, गुंतवणूक करण्यापूर्वी स्टॉकचा ताळमेळ घ्यावा आणि योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यावा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना अभ्यास करून आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यास मोठा नफा मिळू शकतो
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)