PM Internship Scheme: उरले फक्त 48 तास, मोदी सरकारची ही खास स्कीम बंद होणार ,असा करा अर्ज
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पीएम इंटर्नशिप योजना 2024 मध्ये सुरू झाली होती, आता ती दोन दिवसांत बंद होणार आहे. 730 जिल्ह्यांमध्ये 1 लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध होत्या. अर्जाची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे.
मुंबई: पीएम किसाननंतर पीएम इंटर्नशिप ही मोदी सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे. 2024 रोजी ही योजने सुरू करण्यात आली होती. साधारणपणे एक वर्ष ही योजना राबवण्यात आली असून आता ही योजना बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. PM Internship Scheme या दोन दिवसात बंद होणार आहे. 48 तासात ही योजना बंद होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
देशातील सर्वोच्च कंपन्यांमध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. इंटर्नशिपसाठी अधिकृत पोर्टल pminternship.mca.gov.in आहे आणि नोंदणीची शेवटची तारीख 12 मार्च 2025 आहे. या टप्प्यात, भारतातील 730 हून अधिक जिल्ह्यांमधील बाजारपेठेतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये 1 लाखाहून अधिक इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
advertisement
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै 2024 रोजी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची घोषणा केली होती आणि ती 3 ऑक्टोबर 2024 पासून लागू करण्यात आली. अलीकडेच, कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी लोकसभेत सांगितले की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत 28,141 उमेदवारांना इंटर्नशिपच्या संधी मिळाल्या आहेत. इंटर्नशिपचा कालावधी 12 महिने असेल.
advertisement
advertisement
ही योजना औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITIs) आणि कौशल्य केंद्रांमध्ये प्रशिक्षित तरुणांसाठी देखील उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त आहे ते अर्ज करू शकत नाहीत. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२५ आहे.
advertisement
इंटर्नला खऱ्या व्यावसायिक वातावरणात काम करून व्यावहारिक कौशल्ये मिळवण्याची संधी मिळेल. इंटर्नशिप दरम्यान मिळालेला स्टायपेंड त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास मदत करेल. या अनुभवामुळे भविष्यात चांगल्या नोकरीच्या संधींचा मार्ग मोकळा होईल आणि इंटर्नना चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. प्रत्येक इंटर्नला मासिक ५,००० आर्थिक मदत आणि एकवेळ ६,००० रुपये आर्थिक मदत मिळेल.
advertisement